बेड रिकामे असतानाही २३ कोटींचे नवे हॉस्पिटल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 11:44 PM2020-12-16T23:44:16+5:302020-12-16T23:44:29+5:30

‘प्रतापी’ लोकप्रतिनिधीचा हट्ट : उधळपट्टीला संजय वाघुले यांनी केला विरोध

23 crore new hospital even though the beds are empty | बेड रिकामे असतानाही २३ कोटींचे नवे हॉस्पिटल

बेड रिकामे असतानाही २३ कोटींचे नवे हॉस्पिटल

Next

ठाणे : ठामपाने कोविड रुग्णांसाठी उभारलेले ग्लोबल इम्पॅक्ट हब, भूमिपूत्र हॉस्पिटल व इतर ठिकाणी पेशंटअभावी तीन हजारांहून अधिक बेड रिकामे आहेत. बुश कंपनीच्या जागेवरील हॉस्पिटलमध्ये उद्घाटनानंतर केवळ तीन रुग्ण आहेत. परंतु, तरीही ओवळा-माजिवड्याच्या एका ‘प्रतापी’ लोकप्रतिनिधीच्या हट्टापायी मनपाने व्होल्टास कंपनीच्या जागेवरील १,०८५ बेडच्या हॉस्पिटलची लगीनघाई करून त्यासाठी २३ कोटी रुपयांचा कार्यादेश दिला आहे. याला मनपातील भाजपचे गटनेते संजय वाघुले यांनी आक्षेप घेऊन बुधवारी तीव्र विरोध केला आहे.
मनपाने बाळकूम येथील ग्लोबल हब येथे १,०२४ बेडचे हॉस्पिटल उभारले आहे. त्यात १५ कोटी खर्चून आणखी ३०० रुग्णांची क्षमता वाढविली गेली. कळवा येथे भूमिपूत्र हॉस्पिटलमध्ये ६४१, कौसा येथील हॉस्पिटलमध्ये ३९४, ‘बुश’च्या कम्पाउंडमधील रुग्णालयात ४५६ बेडची क्षमता आहे. ज्युपिटर पार्किंग लॉटमधील १,३५० बेडचे हॉस्पिटल पूर्ण झाले. तर, पाच दिवसांपूर्वी झी व मनपाने बोरिवडे येथे ३०६ बेडचे रुग्णालय सुरू केले आहे.
शहरातील रुग्णसंख्या घटत आहे. १५ डिसेंबरला सायंकाळी ‘ग्लोबल’मध्ये ९०५, कौसा स्टेडियम येथे ३४१, भूमिपूत्र हॉस्पिटलमध्ये ५७५ बेड रिकामे आहेत. बोरिवडे येथील हॉस्पिटलमध्ये अद्यापि एकही रुग्ण दाखल झालेला नाही. तर शहरातील १८ खाजगी रुग्णालयांत ७७५ बेड व मनपाच्या हॉस्पिटलमध्ये २,२९४ जागा रिक्त आहेत.  असे असतानाही मनपाने ‘व्होल्टास’च्या जागेवरील हॉस्पिटल सुरू करण्यासाठी लगीनघाई सुरू केली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

नियमांची पायमल्ली
सिडकोच्या १३ कोटींच्या निधीतून ‘व्होल्टास’च्या जागेवर १,०८५ बेडचे हॉस्पिटल उभारण्यात येणार होते. मात्र, या हॉस्पिटलचा खर्च १३ कोटींवरून २३ कोटींपर्यंत फुगविला. विशिष्ट कंत्राटदारावर मेहेरनजर ठेवण्यासाठी  नियमांची पायमल्ली केली, असा आरोप वाघुले यांनी केला.

Web Title: 23 crore new hospital even though the beds are empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.