कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे २३ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:42 AM2021-05-21T04:42:38+5:302021-05-21T04:42:38+5:30

-------------------------------------- टायर डिस्क चोरीला डोंबिवली : पूर्वेकडील कल्याण-शीळ रोडवरील सोनारपाड्यातील रसिला बारजवळ पार्क केलेल्या टेम्पोचे चार टायर डिस्कसह असा ...

23 deaths of corona in Kalyan-Dombivali | कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे २३ मृत्यू

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे २३ मृत्यू

Next

--------------------------------------

टायर डिस्क चोरीला

डोंबिवली : पूर्वेकडील कल्याण-शीळ रोडवरील सोनारपाड्यातील रसिला बारजवळ पार्क केलेल्या टेम्पोचे चार टायर डिस्कसह असा ६० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची घटना ९ मे च्या मध्यरात्री घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

---------------------------------------

दुचाकीची चोरी

डोंबिवली : मानपाडा रोडवरील स्टार कॉलनी, गणेश दर्शनमध्ये राहणारे राजेश विश्वकर्मा यांनी त्यांची दुचाकी ते राहत असलेल्या घराजवळ पार्क केली होती. तेथून ती चोरीला गेल्याची घटना १० मे च्या मध्यरात्री घडली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

---------------------------------------

दुचाकीला धडक

कल्याण : भरधाव वेगातील दुचाकीची धडक अन्य एका दुचाकीला बसल्याने त्यावरील २१ वर्षांचा तरुण जखमी झाल्याची घटना पश्चिमेकडील शहाड सर्कल परिसरात बुधवारी संध्याकाळी ६ वाजता घडली. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात धडक देणा-या दुचाकीचालकाविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

----------------------------------------

फांद्या-पालापाचोळा जैसे थे

डोंबिवली : तौक्ते चक्रीवादळाच्या पूर्वी शहरातील काही झाडांच्या फांद्या छाटण्याची कार्यवाही झाली. परंतु, पाच दिवस उलटून गेले तरी छाटलेल्या फांद्या आणि त्यामुळे निर्माण झालेला पालापाचोळा उचलला गेलेला नाही. हे चित्र ठाकुर्लीतील कल्याण-डोंबिवली रेल्वे समांतर रस्त्यावर पाहायला मिळत आहे. यासंदर्भात केडीएमसीच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कचरा उचलण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले.

------------------------------------------

Web Title: 23 deaths of corona in Kalyan-Dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.