नव्या वर्षात 23 सुट्यांची भेट; तीनदा अंगारकीचा योग, आठ महिन्यांत भरपूर विवाह मुहूर्त

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2020 01:47 AM2020-12-29T01:47:18+5:302020-12-29T07:03:53+5:30

तीनदा अंगारकीचा योग : आठ महिन्यांत भरपूर विवाह मुहूर्त

23 holiday gifts in the new year; | नव्या वर्षात 23 सुट्यांची भेट; तीनदा अंगारकीचा योग, आठ महिन्यांत भरपूर विवाह मुहूर्त

नव्या वर्षात 23 सुट्यांची भेट; तीनदा अंगारकीचा योग, आठ महिन्यांत भरपूर विवाह मुहूर्त

Next

ठाणे : २०२१ मध्ये २५ सुट्ट्यांपैकी २५ एप्रिल श्री महावीर जयंती आणि १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन या दोनच सुट्ट्या रविवारी आल्या आहेत. यामुळे इतर दिनी चाकरमान्यांना २३ सुट्ट्यांची चंगळ अनुभवता येणार आहे. एप्रिलमध्ये आलेल्या ५ पैकी १३ एप्रिल गुढीपाडवा आणि १४ एप्रिल डॉ. आंबेडकर जयंती या दोन सुट्ट्या जोडून आल्या आहेत, अशी माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.

विवाहेच्छुकांसाठी आनंदाची बातमी आहे. आठ महिन्यांत भरपूर विवाह मुहूर्त आहेत. गणेशभक्तांसाठी २ मार्च, २७ जुलै आणि २३ नोव्हेंबर अशा तीन अंगारकी संकष्ट चतुर्थी आलेल्या आहेत. सोने खरेदी करणाऱ्यांसाठी २८ जानेवारी, २५ फेब्रुवारी, ३० सप्टेंबर, २८ ऑक्टोबर आणि २५ नोव्हेंबर असे ५ गुरुपुष्य योग आले आहेत. 

२०२१ हे नूतन वर्ष लीपवर्ष नसल्याने या वर्षात कामे करायला फक्त ३६५ दिवसच मिळणार आहेत. तसेच सरत्या २०२० वर्षात ३१ डिसेंबरच्या रात्री १२ वाजता लीप सेकंद मोजला जाणार नसल्याने नूतन वर्षारंभ रात्री ठीक १२ वाजताच होणार आहे. मात्र, पृथ्वीच्या गतीत होणाऱ्या बदलामुळे २०२१ मध्ये ३० जूनला रात्री १२ वाजता लीप सेकंद मोजला जाण्याची शक्यता असल्याचेही सोमण यांनी सांगितले.

नव्या वर्षात चार चंद्र-सूर्य-ग्रहणे 
 

मुंबई / ठाणे : २०२१ या नवीन वर्षामध्ये आकाशात एकूण चार चंद्र-सूर्य-ग्रहणे होणार आहेत. परंतु, आपल्याकडे ईशान्य भारतातील एका ग्रहणाचा अपवाद वगळता एकही ग्रहण दिसणार नसल्याचे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी सांगितले.

२६ मे रोजी होणारे खग्रास चंद्रग्रहण आपल्या इथून दिसणार नसून ते फक्त ईशान्य भारतातील जगन्नाथपुरी, भुवनेश्वर, कटक, कोलकाता, आसाम, मिझोराम, मेघालय, नागालॅण्ड, अरुणाचल येथून दिसणार आहे. तसेच नूतन वर्षी १० जून रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण, शुक्रवार १९ नोव्हेंबर रोजी खंडग्रास चंद्रग्रहण आणि शनिवार ४ डिसेंबर रोजी खग्रास सूर्यग्रहण होणार आहे. परंतु, ही तीनही ग्रहणे भारतातून दिसणार नाहीत. त्यामुळे २०२१ हे नूतन वर्ष ग्रहणमुक्त आहे.

चंद्रबिंब जेव्हा एखाद्या ग्रह किंवा तारकेला झाकून टाकते, त्याला पिधान युती म्हणतात. यावर्षी १७ एप्रिल रोजी चंद्र-मंगळ पिधान युती दिसणार आहे. मंगळ चंद्राआड जाताना दिसणार नाही. परंतु, सायं. ७.२१ वाजता मंगळ ग्रह चंद्रबिंबामागून बाहेर पडताना दिसणार आहे. खगोलप्रेमींसाठी ही दुर्मीळ घटना पर्वणी ठरणार आहे.

Web Title: 23 holiday gifts in the new year;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.