उल्हासनगरात महिलेच्या मयत पतीच्या बँक खात्यातून २३ लाख काढून केली फसवणूक

By सदानंद नाईक | Published: July 26, 2024 06:53 PM2024-07-26T18:53:23+5:302024-07-26T18:54:28+5:30

सदानंद नाईक, उल्हासनगर : महिलेच्या पतीचा जिवंतपणी विश्वास संपादन करून मृत्यूनंतर बँक खात्यातून २३ लाख रुपये काढल्याचा प्रकार उघड ...

23 lakhs was fraudulently withdrawn from the bank account of a woman's dead husband in Ulhasnagar | उल्हासनगरात महिलेच्या मयत पतीच्या बँक खात्यातून २३ लाख काढून केली फसवणूक

उल्हासनगरात महिलेच्या मयत पतीच्या बँक खात्यातून २३ लाख काढून केली फसवणूक

सदानंद नाईक,
उल्हासनगर :
महिलेच्या पतीचा जिवंतपणी विश्वास संपादन करून मृत्यूनंतर बँक खात्यातून २३ लाख रुपये काढल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात पुनीत विनोद वाघ याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

उल्हासनगर कॅम्प नं-१ परिसरात राहणाऱ्या ज्योती संजय भागवत यांच्या पतीवर विरार येथील संजीवनी हॉस्पिटलमध्ये दारू सोडण्यावर उपचार सुरु होते. त्यावेळी त्यांच्या युनियन बँकेच्या खात्यात २५ लाख ३९ हजार ४१२ रुपये जमा होते. त्या दरम्यान कॅम्प नं-१ तानाजीनगर मध्ये राहणाऱ्या पुनीत विनोद वाघ याने संजय भागवत यांचा विश्वास संपादन करून, त्यांच्या युनियन बँकेचा एटीएम नंबर, चेकबुक व खात्याचा पासवर्ड नंबर माहीत करून घेतला.

संजय भागवत यांचा मृत्यू झाल्यावर पुनीत वाघ याने एप्रिल ते २८ जून २०२३ दरम्यान एटीएम कार्डद्वारे पैसे काढून, चेकद्वारे स्वतःच्या बँक खात्यात पैसे जमा करून २३ लाख रुपयांचा अपहार व फसवणूक केली. तसेच पतीने दिलेली सोन्याची अंगठी वाघ याने घेतल्याचा प्रकार उघड झाल्यावर मयत संजय भागवत यांची पत्नी ज्योती भागवत यांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला सर्व प्रकार पोलिसांना कथन केला. पोलिसांनी ज्योती भागवत यांच्या तक्रारी नंतर पुनीत वाघ यांच्या विरोधात अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: 23 lakhs was fraudulently withdrawn from the bank account of a woman's dead husband in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.