स्मार्ट ठाण्यासाठी धावले २३ हजार स्पर्धक; पुणेकरांची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 02:02 PM2019-08-18T14:02:47+5:302019-08-18T14:05:03+5:30
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंची उपस्थिती आणि पावसाच्या साक्षीने जवळपास २३ हजारांपेक्षा जास्त स्पर्धक ' स्मार्ट सिटी स्मार्ट मॅरेथॉन ' ची घोषणा देत ३० व्या महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत उत्साहात धावले.
ऑनलाईन लोकमत
ठाणे: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंची उपस्थिती आणि पावसाच्या साक्षीने जवळपास २३ हजारांपेक्षा जास्त स्पर्धक ' स्मार्ट सिटी स्मार्ट मॅरेथॉन ' ची घोषणा देत ३० व्या महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत उत्साहात धावले. अतिशय जल्लोषात संपन्न झालेल्या या स्पर्धेत पुरुष व महिला या दोन्ही गटात पुणेकरांनी बाजी मारली. पुरुष गटात करणसिंग घिसाराम याने 1 तास 10 मिनीटे आणि 3 सेकंदामध्ये 21 कि.मी. अंतर पूर्ण करुन अजिंक्यपद पटकावले तर 21 कि.मी.अंतराच्या महिला गटात आरती पाटील हिने 1 तास 27 मिनीटे आणि 47 सेकंदामध्ये स्पधेर्चे अंतर पूर्ण करुन अजिंक्यपद पटकावले. महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली खासदार राजन विचारे, आमदार सुभाष् भोईर, प्रताप सरनाईक तसेच मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. या दोन्ही विजेत्यांना प्रत्येकी रोख रुपए 75 हजार तसेच मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. गतवषीर्पेक्षा यंदा या स्पर्धेत अधिक स्पधर्धकांनी आपला सहभग नोंदविला. गेल्यावर्षी 21 हजार 700 तर या वर्षी 22 हजार 760 स्पर्धक सहभागी झाले होते.
सकाळी 6.30 वा. या स्पर्धेला सुरूवात झाली. 21 किमी स्पर्धेला महापौर मिनाक्षी शिंदे यांच्या हस्ते झेंडा दाखवून प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सुरू झालेल्या विविध गटातील स्पर्धांना राज्याचे सार्व. बांधकाम (उपक्रम), सार्व. आरोग्य मंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी झेंडा दाखवित स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेच्या पुरुष गटात धनवत प्रल्हाद रामसिंग याने तर महिला गटात वर्षा प्राजक्ता पाटील हिने उपविजेतेपद पटकावले यावेळी खासदार राजन विचारे, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर, रविंद्र फाटक, उपमहापौर रमाकांत मढ़वी, स्थायी समिती सभापती राम रेपाळे, सभागृह नेते नरेश म्हस्के, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, अतिरिक्त आयुक्त (2) समीर उन्हाळे, नगरसेवक तथा शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, क्रीडा व सांस्कृतिक समिती सभापती अमर पाटील, शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे, महिला बालकल्याण समिती सभापती जयश्री डेव्हिड, गलिच्छ वस्ती निर्मुलन समिती सभापती मंगल कळंबे, वर्तकनगर प्रभाग समिती अध्यक्ष शनरेंद्र सुरकर,वागळे प्रभाग समिती अध्?यक्षा शिल्पा वाघ, माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अध्यक्षा पद्मा भगत, नगरसेवक दशरथ पालांडे, भूषण भोईर, उमेश पाटील, सुधीर कोकाटे, नगरसेविका नंदिनी विचारे, राधिका फाटक विमल भोईर,रुचिता मोरे, निर्मला कणसे, सुखदा मोरे, रुचिता मोरे, निर्मला कणसे, पल्?लवी कदम, दर्शना म्हात्रे, अंकिता पाटील,प्रभा बोरीटकर, पुजा करसुळे,मिनल संख्ये,परिषा सरनाईक, कांचन चंदरकर, अॅड. सौ.अनिता गौरी, प्रियांका पाटील, माजी महापौर स्मिता इंदुलकर तसेच अतिरिक्त आयुक्त (2) समीर उन्हाळे, उप आयुक्त संदीप माळवी, अशोक बुरपल्ले, ओमप्रकाश दिवटे, सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, नगर अभियंता रवींद्र खडताळे, मोहन कलाल, शिक्षणाधिकारी राजेश कंक्राळ, क्रीडा अधिकारी मीनल पालांडे, जिल्हा अ?ॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव अशोक अहेर,सचिन मराठे, प्रमोद कुलकर्णी आदी सदस्य उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटणकर व मोझेस यांनी केले.
किन्नर समाज व सलाम बालक ट्रस्टचाही सहभाग
यंदा या स्पर्धेत किन्नर समाजही सहभागी झाले होते. आपणही याच समाजाचा एक घटक आहोत हे या माध्यमातून त्यांनी दाखवून दिले. तसेच समाजात एकट्या राहणा-या उपेक्षीत मुलांना 24 तास मदतीचा हात देणारी सलाम बालक ट्रस्टचे पदाधिकारी मुलांसह यात सहभागी झाले होते.