पालिकांना २३२ कोटी

By admin | Published: October 2, 2016 05:56 AM2016-10-02T05:56:01+5:302016-10-02T05:56:01+5:30

मुद्रांक शुल्क अधिभारातून जमा होणाऱ्या निधीतून महापालिकांना देण्यात येणारे अनुदान म्हणून ९३ कोटी ९१ लाख ४४ हजार ४९७ रुपये आणि स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटीचे अनुदान

232 crores to the municipal corporation | पालिकांना २३२ कोटी

पालिकांना २३२ कोटी

Next

- नारायण जाधव, ठाणे

मुद्रांक शुल्क अधिभारातून जमा होणाऱ्या निधीतून महापालिकांना देण्यात येणारे अनुदान म्हणून ९३ कोटी ९१ लाख ४४ हजार ४९७ रुपये आणि स्थानिक संस्था कर अर्थात एलबीटीचे अनुदान म्हणून १३७ कोटी ९७ लाख रुपये असे सुमारे २३१ कोटी ८८ लाख रुपये ठाणे जिल्ह्यातील सहा महापालिकांसह पालघरच्या वसई-विरार महापालिकेकला ऐन नवरात्रौत्सवात मिळाले आहेत.
नगरविकास विभागाने राज्यातील मुंबई वगळता २५ महापालिकांना १ टक्का मुंद्राक शुल्क अधिभाराचे २१६ कोटी ४ लाख ४४ हजार २९२ रुपये वितरीत केले आहेत. त्यात ठाणे -पालघर जिल्ह्यातील महापालिकांच्या वाट्याला ९३ कोटी ९१ लाख ४४ हजार ४९७ रुपये आले आहेत. तर ५० कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांचा स्थानिक संस्था कर बंद केल्यानंतर देण्यात येणाऱ्या अनुदानापोटी आॅक्टोबर महिन्याच्या अनुदान म्हणून या २५ महापालिकांना ४४४ कोटी २२ लाख रुपये वितरीत केले असून त्यात ठाणे-पालघरमधील महापालिकांना १३७ कोटी ९७ लाख रुपये मिळाले आहेत. यामुळे विकासकामे करणे सोपे होणार आहे.

नवरात्रीत जिल्ह्यातील महापालिकांची अशी झाली चांदी
महापालिकेचे नावमुद्रांकएलबीटी
ठाणे२८ कोटी ८५ लाख ७९ हजार ४७४३५ कोटी ७८ लाख रुपये
नवी मुंबई१५ कोटी ५२ लाख ७६ हजार १४८३७ कोटी ०९ लाख रुपये
मीरा-भार्इंदर१३ कोटी २८ लाख ३२ हजार २६ ११ कोटी ६१ लाख रुपये
कल्याण-डोंबिवली१८ कोटी २५ लाख ८२ हजार ४१६ १० कोटी ५३ लाख रुपये
भिवंडी-निजामपूर०२ कोटी २३ लाख ३० हजार २७१ १५ कोटी ४२ लाख रुपये
उल्हासनगर०१ कोटी १९ लाख ६७ हजार ७००११ कोटी ३२ लाख रुपये
वसई-विरार१४ कोटी ५९ लाख ८६ हजार ४६०१६ कोटी ६२ लाख रुपये
एकूण९३ कोटी ९१ लाख ४४ हजार ४९७१३७ कोटी ९७ लाख रुपये

Web Title: 232 crores to the municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.