ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?

By सुरेश लोखंडे | Published: May 6, 2024 10:14 PM2024-05-06T22:14:28+5:302024-05-06T22:15:27+5:30

ठाण्यात एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज मागे

24 candidates in fray for Thane Lok Sabha constituency; The signs have been announced, see what? | ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?

ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?

सुरेश लोखंडे, ठाणे: ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन दाखल केलेल्या उमेदवारांसाठी अर्ज मागे घेण्‍याचा आजचा शेवटचा दिवस होता. आज दुपारी तीन वाजेपर्यत संभाजी जगन्नाथ जाधव या एका अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे घेतला असल्याची माहिती 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये-धुळे यांनी दिली आहे. त्यामुळे आता 24 उमेदवार हे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत.

लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत ही दि. 3 मे 2024 पर्यत होती, तर छाननी दि. 4 मे 2024 रोजी पार पडली. छाननी प्रक्रियेत 11 उमेदवार अवैध ठरले, तर 25 उमेदवारांचे 32 उमेदवारी अर्ज हे वैध ठरले होते. वैध ठरलेल्या उमेदवारांपैकी अपक्ष उमेदवार संभाजी जगन्नाथ जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज आज मागे घेतला आहे.

अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांना चिन्हाचे वाटप करण्यात आले. ‍चिन्हवाटपाची संपूर्ण प्रक्रिया 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक (सर्वसाधारण) जे.श्यामला राव (भा.प्र.से.) यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये यांनी एबी फॉर्म असलेल्या उमेदवारांचे चिन्ह जाहीर केले व अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप केले.
 
25 ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी रिंगणात असलेले उमेदवार व त्यांचे चिन्ह

1.         नरेश गणपत म्हस्के - शिवसेना - धनुष्यबाण (एकूण 4 अर्ज)
2.         राजन बाबूराव विचारे - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे - मशाल (एकूण 4अर्ज )
3.         संतोष भिकाजी भालेराव - बहुजन समाज पार्टी - हत्ती
4.        उत्तम किसनराव तिरपुडे - पिपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) - फळांची टोपली
5.         सुभाषचंद्र झा - सरदार वल्लभभाई पटेल पार्टी - माईक
6.         भवरलाल खेतमल मेहता - हिंदू समाज पार्टी - ऑटो रिक्षा
7.         मुकेश कैलासनाथ तिवारी - भीम सेना - गॅस सिलेंडर
8.         राजेंद्र रामचंद्र संखे - भारतीय जवान किसान पार्टी - भेटवस्तू
9.         राहूल जगबीरसिंघ मेहरोलिया - बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी - नागरिक
10.       विजय ज्ञानोबा घाटे - रिपब्लिकन बहुजन सेना - शिट्टी
11.        सलिमा मुक्तार वसानी - बहुजन महापार्टी - बॅट
12.       अर्चना ‍दिनकर गायकवाड - अपक्ष - किटली
13.       इरफान इब्राहिम शेख - अपक्ष - हिरा
14.       खाजासाब रसुलसाब मुल्ला - अपक्ष - अंगठी
15.       अँड. गुरूदेव नरसिंह सूर्यवंशी - अपक्ष - बॅटरी टॉर्च
16.       चंद्रकांत विठ्ठल सोनावणे - अपक्ष - खाट
17.       डॉ.पियूष के. सक्सेना - अपक्ष - बासरी
18.       प्रमोद आनंदराव धुमाळ - अपक्ष - स्टेथस्कोप
19.       मल्लिकार्जुन सायबन्न्ना पुजारी - अपक्ष - सफरचंद (एकूण दोन अर्ज)
20.       राजीव कोंडिंबा भोसले - अपक्ष - तुतारी
21.       सिध्दांत छबन शिरसाट - अपक्ष - टिव्ही रिमोट
22.       दत्तात्रय सिताराम सावळे - अपक्ष - रोडरोलर
23.       सुरेंद्रकुमार के. जैन - अपक्ष - फोन चार्जर
24.      संजय मनोहर मोरे - अपक्ष - जेवणाचे ताट

Web Title: 24 candidates in fray for Thane Lok Sabha constituency; The signs have been announced, see what?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.