ठाण्यात एकाच दिवशी आढळले 24 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; आकडा पोहचला 64 वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 11:51 PM2020-04-02T23:51:06+5:302020-04-02T23:51:13+5:30
ठामपामध्ये 48 तासांनंतर दोन रुग्ण मिळाली आले असून त्यामध्ये ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात एका वैद्यकीय कर्मचाऱ्यासह आणखी एकाचा समावेश आहे.
ठाणे : जिल्ह्यात बुधवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 40 होती. ती संख्या गुरुवारी थेट तब्बल 24 ने वाढल्याने जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची 64 इतकी झाली आहे. हे 24 रुग्ण ठाणे,कल्याण-डोंबिवली, नवीमुंबई आणि मीरा भाईंदर या चार महापालिका कार्यक्षेत्रातील आहे. त्यातील सर्वाधिक 11 रुग्ण हे नवीमुंबईतील आहेत. त्यापाठोपाठ केडीएमसी - 6, मीरा भाईंदर 5 आणि ठाणे 2 येथील पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
ठामपामध्ये 48 तासांनंतर दोन रुग्ण मिळाली आले असून त्यामध्ये ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात एका वैद्यकीय कर्मचाऱ्यासह आणखी एकाचा समावेश आहे. तर, जिल्ह्यात मागील तीन दिवसात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाच ने वाढत होती.
गुरुवारी वाढलेल्या संख्येने ठामपा कार्यक्षेत्रातील रुग्णांची संख्या 13, नवीमुंबई -22, केडीएमसी-19,मिराभाईंदर -6,ठाणे ग्रामीण-3 आणि उल्हासनगर -1 असे एकूण 64 कोरोना बाधित रुग्ण जिल्ह्यात सापडले आहेत.