निवृत्तीवेतनापासून २४ कर्मचारी वंचित

By admin | Published: June 10, 2017 01:05 AM2017-06-10T01:05:30+5:302017-06-10T01:05:30+5:30

एमएस-सीआयटी परीक्षा वेळेत उत्तीर्ण न झाल्याने केडीएमसीतील २४ निवृत्त कर्मचाऱ्यांची निवृत्तीवेतनासाठी फरफट सुरू आहे.

24 employees from pensions, deprived | निवृत्तीवेतनापासून २४ कर्मचारी वंचित

निवृत्तीवेतनापासून २४ कर्मचारी वंचित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : एमएस-सीआयटी परीक्षा वेळेत उत्तीर्ण न झाल्याने केडीएमसीतील २४ निवृत्त कर्मचाऱ्यांची निवृत्तीवेतनासाठी फरफट सुरू आहे. त्यांच्याव्यतिरिक्त ५४८ कर्मचाऱ्यांनी ही परीक्षा उत्तीर्ण न केल्याने हा निवृत्तीवेतनापासून वंचित राहण्याचा आकडा भविष्यात वाढण्याची शक्यता आहे.
गतिमान प्रशासन, पेपरलेस कारभार करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना सरकारने एमएस-सीआयटीचे प्रशिक्षण बंधनकारक केले आहे. हे प्रशिक्षण डिसेंबर २००७ पर्यंत घेणे आवश्यक होते. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कर्मचाऱ्यांना सरकारने दोनदा संधी दिली होती. ती उत्तीर्ण न झाल्यास संबंधितांना वेतनवाढ तसेच निवृत्तीवेतन मिळणार नाही, असा आदेशही काढला होता.
वर्ग-१ ते ३ मधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी ही एमएस-सीआयटीची परीक्षा आहे. केडीएमसीतील एकूण ५७२ कर्मचारी अजूनही ही परीक्षा उत्तीर्ण झालेले नाहीत. त्यातील २४ कर्मचारी निवृत्त झाले आहेत. परंतु, परीक्षा न दिल्याने त्यांना निवृत्तीवेतनापासून वंचित राहावे लागले आहे. या निवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये विहीत कालावधीनुसार निवृत्त होणारे, मृत्यू झालेले तसेच स्वेच्छानिवृत्ती घेतलेले कर्मचारी आणि निवृत्त शिक्षकही आहेत.
एमएस-सीआयटी परीक्षा वेळेत पास न झालेल्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ वसूल करण्याचा अध्यादेश सरकारने काढला आहे. यामुळे सामान्य प्रशासन विभागाकडून निवृत्तीवेतन लागू करण्यासाठी पाठवलेले प्रस्ताव लेखा विभागाकडून आक्षेप नोंदवून संबंधित विभागाला परत पाठवण्यात आले आहेत.

Web Title: 24 employees from pensions, deprived

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.