कल्याण-डोंबिवलीत स्वाईन फ्लूचे 24 रुग्ण
By admin | Published: July 6, 2017 10:57 AM2017-07-06T10:57:00+5:302017-07-06T10:57:00+5:30
कल्याण-डोंबिवली परिसरात स्वाइन फ्लूचे 24 रुग्ण आहेत, त्या संदर्भात महापालिकेचे सभागृह नेते राजेश मोरे यांनी शास्त्री नगर रुग्णालयाला भेट दिली
Next
ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. 6 - कल्याण-डोंबिवली परिसरात स्वाइन फ्लूचे 24 रुग्ण आहेत, त्या संदर्भात महापालिकेचे सभागृह नेते राजेश मोरे यांनी शास्त्री नगर रुग्णालयाला भेट देत सध्याची स्वाईन फ्लू संदर्भात आरोग्य विभागाची काय तयारी आहे याची पाहणी केली.
आरोग्य अधिकारी डॉ.आर. डी. लवंगारे यांच्याशी चर्चा केली. महापालिकेच्या रुग्णालयाकडे स्वाइन फ्लूसाठी लागणारी लस उपलब्ध नाहीय. टेमीफ्लू गोळ्या महापालिककेकडून खासगी रुग्णालयात विनामूल्य दिल्या जातात.
आणखी वाचा
ठाण्यापेक्षा इथली परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा डॉक्टरांनी केल्यावर 24 रुग्ण असणे ही गंभीर बाब असून कोणाशीही तुलना करू नका असेही मोरे यांनी खडसावले. लहान मुलांचे सिरप देखील नसून ते राज्य शांसनाने त्वरित द्यावे यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देत असल्याचे त्यांनी सांगितले.