ठाणे मनपा कर्मचाऱ्यांना 24 हजार सानुग्रह अनुदान जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 10:40 PM2024-10-11T22:40:41+5:302024-10-11T22:42:17+5:30
पालिका कर्मचाऱ्यांना ३० हजार सानुग्रह अनुदान मिळावे अशी मागणी युनियन तर्फे करण्यात आली होती.
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे महापालिकेच्याकामगार कर्मचाऱ्यांना २४ हजार सानुग्रह अनुदान जाहीर झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामगारांच्या दृष्टीने विचार करून हे अनुदान जाहीर केले असल्याची माहिती म्युनिसिपल लेबर युनियने दिली आहे.
पालिका कर्मचाऱ्यांना ३० हजार सानुग्रह अनुदान मिळावे अशी मागणी युनियन तर्फे करण्यात आली होती. तसे पत्र देख प्रशासनाला सादर करण्यात आले होते. या बाबत युनियनचे अध्यक्ष रवी राव यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे पदाधिकारी प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करत होते. युनियनचे उपाध्यक्ष मोहन तिवारी यांनी 10 ऑक्टोबर रोजी आयुक्त सौरभ राव यांच्या बरोबर चर्चा केली. चर्चेत आयुक्तांनी सांगितले की, "कामगार कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. तसेच सानुग्रह अनुदान अदा करण्यास तत्वतः मान्यता दिली. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर चर्चा करून सानुग्रह अनुदान जाहीर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावर्षी सुद्धा त्यांनी २४ हजार सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. मागील वर्षी २१५०० सानुग्रह अनुदान मिळाले होते. यंदा त्यात २५०० रुपयांची वाढ झाली आहे."