२४५ सफाई मार्शल करणार १ डिसेंबर पासून शहर अस्वच्छ करणाऱ्यांकडून दंड वसुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 04:08 PM2017-11-28T16:08:29+5:302017-11-28T16:12:07+5:30

उघड्यावर शौचास बसणे, मुत्र विसर्जन करणे, कचरा टाकणे आदींसह शहर अस्वच्छ करु पाहणाऱ्यावर आता २४५ सफाई मार्शल वॉच ठेवणार आहेत.

 245 cleansing the Marshal from 1 December to recover the penalty from the city | २४५ सफाई मार्शल करणार १ डिसेंबर पासून शहर अस्वच्छ करणाऱ्यांकडून दंड वसुल

२४५ सफाई मार्शल करणार १ डिसेंबर पासून शहर अस्वच्छ करणाऱ्यांकडून दंड वसुल

Next
ठळक मुद्दे१ डिसेंबर पासून होणार कारवाईला सुरवात१०० रुपये ते २० हजार पर्यंत आकारला जाणार दंडप्रत्येक प्रभाग समितीत २५ सफाई मार्शल आॅन ड्युटी २४ तास काम करणार

ठाणे - उघड्यावर शौचास बसलात, कचरा टाकताय, रस्त्यात थुंकत आहात, तर मग थांबा. कारण तुमच्यावर आता तब्बल २४५ सफाई मार्शल वॉच ठेवण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे अशा काही कृत्या करीत असाल तर तुम्ही दंड भरण्यासाठीही तयार रहा असा इशाराच पालिकेने दिला आहे. येत्या १ डिसेंबर पासून सफाई मार्शल दंड वसुल करण्यासाठी शहरभर फिरणार आहेत.
शहर अस्वच्छ करणाऱ्या नागरिकांकडून दंड आकारून चाप बसवण्याचा निर्णय ठाणे महापालिकेने घेतला होता. या संदर्भात २०१२ मध्ये उपविधीसुध्दा तयार करण्यात आली होती. या उपविधीला अखेर शासनाने मंजुरी दिली असून त्याची शहरभर अमंलबजावणी करण्यासाठी महापालिका आता २४५ सफाई मार्शलची नियुक्ती करणार आहे. हे सफाई मार्शल शहर अस्वच्छ करु पाहणाऱ्या नागरीकांकडून दंड वुसल करणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव नुकत्याच झालेल्या महासभेत मंजुर करण्यात आला आहे. परंतु आता शहर अस्वछ करणाºया व्यक्तींकडून वसूल करण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. शहरात दररोज ७०० मेट्रीक टन कचरा निर्माण होत असून हा कचरा गोळा करण्यासाठी पालिकेजवळ १५० घंटागाड्या आहेत. पाच वर्षापूर्वी शहरात ५०० पेक्षा अधिक कचरा टाकण्याची ठिकाणे होती. हे प्रमाण १५० वर आले असले तरी उघड्यावर कचरा टाकणाऱ्याची संख्या मात्र कमी झालेली नाही. केवळ उघड्यावर कचरा टाकणे इथपर्यंत हे प्रमाण मर्यादित नसून रस्त्यांवर थुंकणे, स्नान करणे, मुत्र विसर्जन करणे, इमारतीची मलावाहिनी अथवा जलवाहिनी फुटणे, इलेक्ट्रोनिक वस्तूंच्या कचºयाचे विभक्तीकरण करणे अशा अनेक गोष्टींचे पालन न करण्यात येत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे पालिकेने नव्याने उपविधी तयार केली असून या उपविधीला मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार आता १० रुपया पासून थेट २० हजारापर्यंत दंड आकारला जाणार आहे.
यासाठी आता २४५ सफाई मार्शलची नेमणूक करण्यात येत असून या संदर्भातील निविदा प्रक्रिया अंतिम झाली असून त्याचा प्रस्ताव देखील नुकत्याच झालेल्या महासभेत मंजुर करण्यात आला आहे. त्यानुसार आता प्रत्येक प्रभाग समितीत साधारणपणे प्रत्येकी २५ या प्रमाणे, हे मार्शल १ डिसेंबर पासून वॉच ठेवणार आहेत. आॅन ड्युटी २४ तास या प्रमाणे हे मार्शल काम करणार असल्याचे पालिकेच्या घनकचरा विभागाने स्पष्ट केले आहे.
अशी आहे दंडाची रक्कम -
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे २०० रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे १००, सार्वजनिक ठिकाणी अंगोळ करणे १००, मुत्र विसर्जन १५०, प्राणी व पक्ष्यांना खाद्य भरवणे ५००, रस्त्याच्या कडेने शौचास बसने १५०, व्यावसायिक वाहनांना रस्त्याच्या कडेला धुणे १०००, रस्त्याच्या कडेला कपडे व भांडी धुणे १००, अस्वस्छ परिसर आणि आवार १०,०००, इमारतीच्या पिण्याच्या पाइपलाईन मधील सांडपाण्याच्या पाईपलाईन मधील गळती आणि त्यामुळे इतरांना होणारा त्रास आणि सुचना दिल्यानंतरही १० दिवसात दुरु स्ती न केल्यास १०,००० रु पयांचा दंड आकारण्यात येणार आहे.




 

Web Title:  245 cleansing the Marshal from 1 December to recover the penalty from the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.