एम्स परीक्षेत वेदांत देशात २४ वा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:36 AM2019-06-16T00:36:36+5:302019-06-16T00:36:50+5:30
आता एमबीबीएसची तयारी; डॉक्टर होण्याचे स्वप्न होणार पूर्ण
ठाणे : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) या नवी दिल्लीतील संस्थेने २५-२६ मेमध्ये घेतलेल्या परीक्षेत मुंबईच्या पवईतील वेदांत प्रशांत काशीकर हा देशातून २४ वा आला आहे. आता एमबीबीएस डॉक्टर होण्याची तयारी सुरू केल्याचे त्याने लोकमतशी बोलताना सांगितले.
वेदांतने दहावी झाल्यानंतर एम्सच्या परीक्षेची तयारी सुरू केली होती. त्यासाठी तो घर सोडून अंधेरीतील हॉस्टेलमध्ये राहण्यास गेला.
रोज सकाळी ८ ते दुपारी दीड वाजेपर्यंत क्लासमध्ये अभ्यास केल्यानंतर हॉस्ट्ेलमध्ये सहा ते सात अभ्यास करताना त्याने पेपर सोडण्यावर विशेष भर दिला. ही परीक्षा २०० गुणांची असून तीत उत्तर योग्य असल्यास एक गुण मिळतो. तसेच एखादे उत्तर चुकीचे ठरल्यास एक तृतियांश गुण कापला जातो. या परीक्षेला देशभरातून चार लाख विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये २४ वा आल्याचे वेदांत याने सांगितले. या यशाचे श्रेय त्याने आइवडिलांसह त्याच्या गुरुजनांना दिले आहे. तसेच घरातून अशाप्रकारच्या परीक्षेस कोणीही बसले नव्हते. ही परीक्षा कठीण असल्याने दहावी झाल्यानंतर दोन वर्षे तिची तयारी केली, त्यामुळेच यशस्वी झालो याचा खूप आनंद आहे. तसेच या यशामुळे कौतुकांचा वर्षावही होत असला तरी पुढे दिल्लीतून एमबीबीएस शिक्षण पूर्ण करून डॉक्टर होणार असल्याचे तो म्हणाला.