मीरा-भाईंदरमध्ये निवडणुकीपुरताच केला २५ दशलक्ष पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 11:50 PM2020-10-08T23:50:51+5:302020-10-08T23:50:57+5:30

काँग्रेसचा सत्ताधाऱ्यांवर आरोप; नागरिकांना भेडसावतेय टंचाई

25 million water supply in Mira Bhayandar for elections only | मीरा-भाईंदरमध्ये निवडणुकीपुरताच केला २५ दशलक्ष पाणीपुरवठा

मीरा-भाईंदरमध्ये निवडणुकीपुरताच केला २५ दशलक्ष पाणीपुरवठा

Next

मीरा रोड : गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत मीरा-भार्इंदरमध्ये राजकीय फायदा घेण्यासाठी सत्ताधारी भाजपने २५ दशलक्ष लीटर पाणी नागरिकांना दिले. नंतर हे पाणी बंद केले, असा आरोप बुधवारी काँग्रेसने पत्रकार परिषदेत केला. २४ तास पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात काही महिन्यांपासून नागरिकांना टंचाईला सामोरे जावे लागत आहे ,असे काँग्रेसने म्हटले आहे.

नागरिकांना खाजगी अथवा पालिकेचा टँकर मागवून पाणी विकत घ्यावे लागत आहे. टंचाईबाबत आमदार गीता जैन, प्रताप सरनाईक तसेच महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी थेट महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास पत्र पाठवून विचारणा केली. त्यावर महामंडळाने महापौरांना दिलेल्या उत्तरात स्पष्ट केले आहे की , मीरा-भार्इंदरला मंजूर पाणीकोट्यातील २५ दशलक्ष लीटर पाणी हे २०१९ च्या पावसाळ्यापुरते तात्पुरत्या स्वरूपात दिले होते. हे पाणी मार्चपासून बंद केलेले आहे. १ मार्च ते ३१ आॅगस्टदरम्यान महामंडळाने महापालिकेत मंजूर कोट्यानुसार प्रतिदिवस सरासरी ९९.२१ दशलक्ष लीटर इतका पाणीपुरवठा केलेला आहे, असे स्पष्ट केले आहे.

महामंडळाने दिलेल्या उत्तरानंतर भाजप अडचणीत आली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, गटनेते जुबेर इनामदार, नगरसेवक अनिल सावंत, गीता परदेशी, अशरफ शेख आदींनी पत्रकार परिषद घेतली. सत्ताधारी भाजप, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांच्यावर नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला.

हे पाणी कायम असल्याचे भासवून शहरात मोठ्या संख्येने नवीन नळजोडण्या दिल्या गेल्या. नागरिकांनी नळजोडणीसाठी लाखो रुपये खर्च केले. पण, नळजोडण्या घेऊन नळाला पाणी नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून २५ दशलक्ष लीटर पाणी आम्ही नागरिकांना मिळवून देऊ, असे सामंत म्हणाले.

एमआयडीसी, पालिका अधिकाऱ्यांची महापौरांनी घेतली बैठक
२५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा तात्पुरता पावसाळ््या पुरता म्हणून देऊन तो आता बंद केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सत्ताधारी भाजपवर टीकेची झोड काँग्रेस सह विविध स्तरातून उठली आहे. त्यामुळे महापौरांनीही तातडीने या बाबत भाजप नगरसेवकांना घेऊन एमआयडीसी व पालिका अधिकाºयांची गुुरु वारी बैठक घेतली. महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी बोलावलेल्या बैठकीस आयुक्त, अतिरिक्त आयुक्त , पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता व एमआयडीसीचे अधिकारी तसेच भाजपच्या नागरसेवकांसह माजी आमदार नरेंद्र मेहताही उपस्थित होते . मीरा भार्इंदर साठी एमआयडीसीकडे मंजूर १२५ दशलक्ष लिटर इतके पूर्ण पाणी मिळावे, तांत्रिक बिघाडामुळे कमी दिलेले पाणी शहराला द्यावे, वारंवार होणाºया बिघाडांवर तोडगा काढावा. तर आयुक्त देखील स्वत: एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांना भेटून पाणी समस्येवर चर्चा करतील असे महापौरांनी सांगितले .

Web Title: 25 million water supply in Mira Bhayandar for elections only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.