ठाणे जिल्ह्यात सरासरी २५ मिमी पाऊस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:50 AM2021-06-09T04:50:17+5:302021-06-09T04:50:17+5:30
ठाणे : जिल्ह्यात सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरणासह हवेत गारवा अनुभवायला मिळाला. सकाळी जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी ...
ठाणे : जिल्ह्यात सोमवारी सकाळपासून ढगाळ वातावरणासह हवेत गारवा अनुभवायला मिळाला. सकाळी जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या. गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत तब्बल २४.८ मिमी पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस ठाणो ४०.८ मिमी, तर कल्याणला ४४.७ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. मुरबाडला अत्यल्प पाऊस पडला. यापेक्षा अधिक पाऊस भिवंडीला २२.९ मिमी, शहापूरला २.३ मिमी. उल्हासनगरला ४४.५ मिमी आणि अंबरनाथला ३२.३ मिमी. पाऊस पडल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. जिल्ह्यात गेल्या एक जूनपासून सोमवारी संध्याकाळपर्यंत तब्बल ५५.५ मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे. आठवड्यात सर्वात जास्त पाऊस कल्याण तालुक्यात ८६.१ मिमी पडलेला आहे.