दिव्याच्या म्हात्रे वाडीतील २५० कुटुंबे १२ तास पाण्यात, संयुक्त बैठक बोलावून नुकसानभरपाई द्यावी, शानू पठाण यांची मागणी  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 04:20 PM2021-07-18T16:20:24+5:302021-07-18T16:20:52+5:30

दिवा पंचक्रोशीतील शीळ- कल्याण मार्गावरील म्हात्रे वाडीतील ब्रिटीशकालीन मोठा नाला बुजविल्यामुळे याठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. रविवारी पहाटे २ वाजता झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण परिसर जलमय झाला

250 families in Divya's Mhatre Wadi should be compensated by calling a joint meeting in 12 hours water | दिव्याच्या म्हात्रे वाडीतील २५० कुटुंबे १२ तास पाण्यात, संयुक्त बैठक बोलावून नुकसानभरपाई द्यावी, शानू पठाण यांची मागणी  

दिव्याच्या म्हात्रे वाडीतील २५० कुटुंबे १२ तास पाण्यात, संयुक्त बैठक बोलावून नुकसानभरपाई द्यावी, शानू पठाण यांची मागणी  

googlenewsNext

ठाणे - दिवा पंचक्रोशीतील शीळ- कल्याण मार्गावरील म्हात्रे वाडीतील ब्रिटीशकालीन मोठा नाला बुजविल्यामुळे याठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. रविवारी पहाटे २ वाजता झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण परिसर जलमय झाला असून येथील अडीचशे कुटुंबांना सुमारे बारा तास पाण्यात रहावे लागले. या नागरिकांवर येणारे हे संकट कायमचे दूर करण्यासाठी ठाणे महापालिकेने एमएमआरडीए, एमआयडीसी, विपक्ष नेते , स्थानिक नगरसेवक आणि रहिवाशांची संयुक्त बैठक बोलवावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते अश्रफ शानू पठाण यांनी केली आहे. 
 दिवा प्रभाग समितीअंतर्गत म्हात्रेवाडी ही अडीचशे घराची वसाहत आहे. या भागातील  हा ओढा परिसरातील सर्व सांडपाणी तसेच पावसाचे पाणी वाहून नेत होता. मात्र, रस्ते बांधकाम प्राधिकरणाने या ठिकाणी रस्त्याचे बांधकाम करताना येथील मोरी आणि सबंध ओढाच बुजवून टाकला आहे. परिणामी, मोठ्याजास्त पाऊस झाल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात पाणी तुंबत आहे. रविवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास अतिवृष्टी झाल्यानंतर या भागात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले. हे पाणी येथील नागरिकांच्या घरात सुमारे बारा तासाहून अधिक काळ तुंबले होते. या ठिकाणी विरोधीपक्ष नेते पठाण यांनी भेट दिली. 
 प्रशासनाच्या म्हणजेच रस्ते प्राधिकरणाच्या चुकीमुळे ही पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरस्थितीमुळे येथील  नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने येथील  पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, संयुक्त बैठक बोलावून ही समस्या कायमची निकाली काढावी, अशी मागणी केली.

Web Title: 250 families in Divya's Mhatre Wadi should be compensated by calling a joint meeting in 12 hours water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.