पिण्याच्या पाण्यासाठी २५० कुटुंबाची परवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 12:42 AM2018-06-25T00:42:32+5:302018-06-25T00:42:34+5:30

शहर व परिसरात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे २५० कुटुंबाची परवड सुरू आहे. त्यांना निदान पिण्याचे पाणी मिळावे म्हणून तीन वर्षापासून बांगडगल्लीतून पाणी पुरवले जात आहे

250 family safe for drinking water | पिण्याच्या पाण्यासाठी २५० कुटुंबाची परवड

पिण्याच्या पाण्यासाठी २५० कुटुंबाची परवड

Next

भिवंडी : शहर व परिसरात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे २५० कुटुंबाची परवड सुरू आहे. त्यांना निदान पिण्याचे पाणी मिळावे म्हणून तीन वर्षापासून बांगडगल्लीतून पाणी पुरवले जात आहे. मात्र पाणीटंचाई असलेल्या भागातील नगरसेवक याकडे लक्ष देत नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
अंबिकानगर, संगमपाडा, इदगारोड, भारत नगर, डगलपाडा, आझमीनगर, समरूबाग व खाडीपार भागातील सुमारे २५० कुटुंबांना नियमित पिण्याचे पाणी मिळत नाही. या भागात बहुतांश यंत्रमाग कामगार असून वारंवार मागणी करूनही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे या भागातील सुमारे २५० कुटुंबातील सदस्य सायकल, टेम्पो किंवा दुचाकीवर प्लास्टिकचे १० लिटरचे कॅन घेऊन शहरातील बांगडगल्ली परिसरांत रात्रीच्यावेळी येतात. रोज ६०० ते ७०० प्लास्टिकच्या कॅनमधून पिण्याचे पाणी वाहून घेऊन जातात. हा प्रकार तीन वर्षापासून सुरू आहे. रात्री दहा ते अडीचपर्यंत या नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो.
तीन वर्षापूर्वी पिण्याच्या पाण्यासाठी खाडीपार भागातून एक मजूर या भागात आला असता बांगड गल्लीतील शकील हबीबुल्ला यांनी आपल्या इमारतीच्या नळातून प्लास्टिकचा कॅन भरून दिला. तो नियमित कॅन भरून घेऊन जाऊ लागला. आपल्याकडे आलेल्या सर्वांना प्लास्टिकच्या कॅनमध्ये पाणी भरून देण्यास शकील यांनी सुरूवात केली. पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी लोकप्रतिनिधी कुठलेच पाऊल उचलत नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. या बाबत खाडीपार येथील सायकलवरून पाणी वाहून नेणाऱ्या कामगारास विचारले असता तो म्हणाला की, आमच्या भागातील नेते गरीबांकडे लक्ष देत नाही. आम्ही यंत्रमागावर तर कधी मोलमजुरी करून कुटुंब पोसतो.

Web Title: 250 family safe for drinking water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.