उल्हासनगरात २६ बोगस डॉक्टर, १८ जणावर गुन्हे; महापालिकेची धडक कारवाई
By सदानंद नाईक | Updated: March 26, 2025 19:06 IST2025-03-26T19:06:13+5:302025-03-26T19:06:13+5:30
मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टरांनी क्लिनिक उघडले असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या.

उल्हासनगरात २६ बोगस डॉक्टर, १८ जणावर गुन्हे; महापालिकेची धडक कारवाई
सदानंद नाईक
उल्हासनगर : नागरिकांच्या तक्रारीनंतर केलेल्या चौकशीत एकूण २६ बोगस डॉक्टरांचे बिंग फुटले. त्यापैकी १८ बोगस डॉक्टरावर महापालिका वैद्यकीय आरोग्य विभागाच्या तक्रारीनुसार विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असून बोगस डॉक्टरांवर वॉच असल्याचे संकेत वैद्यकीय अधिकारी डॉ मोनिका धर्मा यांनी दिले आहे.
उल्हासनगरात मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टरांनी क्लिनिक उघडले असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. वैद्यकीय अधिकारी डॉ मोनिका धर्मा यांनी ऐक पथक स्थापन करून शहरातील डॉक्टरांची तपासणी सुरु केली. या चौकशीत शहरात २६ डॉक्टर बोगस असल्याचे उघड झाले. दरम्यान ही कारवाई थंड पडल्याची टीका झाल्यावर, आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी आरोग्य विभागाला धारेवर धरले. त्यानंतर वैधकीय परवाना नसलेल्या २६ पैकी १८ डॉक्टरा विरोधात तक्रारी दिल्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. उर्वरित ८ पैकी ३ जणाकडे महाराष्ट्र वैधकीय कॉन्सिलचे वैधकीय परवाना असून ४ क्लिनिक बंद आहेत. त्या डॉक्टरांचा ठावठिकाणा शोधण्यात येत आहे. तर ऐक डॉक्टर कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात येत असल्याने, त्याबाबत महापालिकेला माहिती देण्यात आली.
नागरिकांच्या जीवासी खेळ
महापालिका हद्दीत गेल्या ६ महिन्या पेक्षा जास्त कालावधी पासून हे बोगस डॉक्टर नागरिकांच्या जीवासी खेळत असल्याने, त्यांच्या हातून चुकीचे औषध दिल्यावर काही दुर्दैवी घटना घडल्या का? याचा तपास होण्याची मागणी होत आहे.
बोगस डॉक्टरवर कारवाई का थंडावली
महापालिका हद्दीत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाल्याच्या असंख्य तक्रारी होऊनही, वैधकीय विभागाने त्याची दखल यापूर्वी का घेतली नाही?. असे प्रश्नचिन्हे उभे ठाकले. यांना कोणाचे अभय होते, कितीचा हप्ता संबंधिताना मिळत होता? असे प्रश्न नागरिकांकडून होत आहे.
रुग्णालयात बोगस डॉक्टर
शहरातील मोठ्या खाजगी रुग्णालयात अनेक डॉक्टर व नर्स बोगस असून रुग्णाच्या जीवितांशी खेळत आहेत. असी चर्चा यनिमित्तानी सुरु झाली. अश्या रुग्णालयात महापालिकेने धाड टाकून डॉक्टरांच्या कागदपत्राची तपासणी केल्यास, मोठे घबाड मिळण्याची शक्यता निर्माण झाली.