वसई न्यायालयात २६ हजार दावे प्रलंबित

By admin | Published: October 27, 2015 12:04 AM2015-10-27T00:04:43+5:302015-10-27T00:04:43+5:30

वसई न्यायालयामध्ये सुमारे २६ हजार दावे प्रलंबित असून ते निकाली दावे निकाली काढण्यासाठी जलदगती न्यायालय सुरू करण्याची मागणी आहे

26 thousand cases pending in the Vasai court | वसई न्यायालयात २६ हजार दावे प्रलंबित

वसई न्यायालयात २६ हजार दावे प्रलंबित

Next

वसई : वसई न्यायालयामध्ये सुमारे २६ हजार दावे प्रलंबित असून ते निकाली दावे निकाली काढण्यासाठी जलदगती न्यायालय सुरू करण्याची मागणी आहे. याप्रकरणी विधी तसेच न्याय विभाग मुंबई उच्च न्यायालयाच्या संपर्कात आहे.
वसई न्यायालयामध्ये सुमारे १० हजार २५० दिवाणी, तर १५ हजार ८०० फौजदारी असे एकूण २६ हजार ५० दावे प्रलंबित आहेत. वारंवार पडणाऱ्या तारखांमुळे पक्षकार हैराण आहेत. तर, न्यायालयातील कामकाजाचा ताण न्यायाधीश, कर्मचारी तसेच वकील अशा तिघांवर मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. दररोज अधिकाधिक दावे दाखल होत असल्यामुळे आता या परिसरासाठी जलदगती न्यायालय स्थापन करणे गरजेचे आहे. राष्ट्रवादीचे आ. आनंद ठाकूर यांनी यासंदर्भात विविध स्तरांवर पत्रव्यवहार सुरू केल्यानंतर राज्याच्या विधी व न्याय विभागाच्या सहसचिवांनी उच्च न्यायालयाचा अभिप्राय घेण्याकरिता पत्र पाठवल्याचे कळवले आहे.

Web Title: 26 thousand cases pending in the Vasai court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.