ठाणे जिल्ह्यात कोरोनाचे २६५ रुग्ण सापडले; तीन जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 07:56 PM2021-02-07T19:56:26+5:302021-02-07T19:56:37+5:30
उल्हासनगरला पाच रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या ११ हजार ६६३ झाली. तर, ३६८ मृतांची नोंद आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यात रविवारी कोरोनाचे २६५ रुग्ण आढळले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. आता दोन लाख ५५ हजार ७४९ बाधितांची नोंद झाली. दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार १८३ झाली आहे.
ठाणे शहरात ६९ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ५९ हजार ५४८ झाली. शहरात एकाचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ३६८ नोंदली. कल्याण - डोंबिवलीत ७७ रुग्णांची वाढ झाली असून एकही मृत्यू नाही. आता ६० हजार ६०६ रुग्ण बाधीत असून एक हजार १७७ मृत्यूची नोंंद झाली आहे.
उल्हासनगरला पाच रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या ११ हजार ६६३ झाली. तर, ३६८ मृतांची नोंद आहे. भिवंडीला एकही बाधीत व मृत्यू नाही. आता बाधीत सहा हजार ७२८ असून मृतांची संख्या ३५४ आहे. मीरा भाईंदरमध्ये २३ रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. या शहरात बाधितांची संख्या २६ हजार ४३३ असून मृतांची संख्या ८०० झाली.
अंबरनाथमध्ये आठ रुग्ण आढळल्याने आता बाधीत आठ हजार ६२१ असून मृत्यू ३१२ झाले आहेत. बदलापूरमध्ये १७ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत नऊ हजार ४३४ नोंदले आहेत. या शहरात मृत्यू झाल्याने मृत्यूची संख्या १२५ कायम आहे. ग्रामीणमध्ये तीन रुग्णांची वाढ झाली असून एक मृत्यू नाही. आता बाधीत १९ हजार २६१ आणि आतापर्यंत ५८७ मृत्यू झाले आहेत.