ठाण्यात २६ जानेवारी रोजी रंगणार २६ वे भव्य राष्ट्रीय कवी संमेलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 04:46 PM2019-01-19T16:46:33+5:302019-01-19T16:52:42+5:30

ठाण्यात २६ जानेवारी रोजी २६ वे भव्य राष्ट्रीय कवी संमेलन रंगणार आहे. 

The 26th National Poetry Convention, which will be held on January 26 in Thane | ठाण्यात २६ जानेवारी रोजी रंगणार २६ वे भव्य राष्ट्रीय कवी संमेलन 

ठाण्यात २६ जानेवारी रोजी रंगणार २६ वे भव्य राष्ट्रीय कवी संमेलन 

Next
ठळक मुद्दे २६ वे भव्य राष्ट्रीय कवी संमेलन  'हिंदी भाषी एकता परिषद, ठाणे' या संस्थेच्या वतीने कवी संमेलन विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजाविणा-या ३ व्यक्तींना पुरस्कार

ठाणे : सर्वसामान्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागृतीसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या 'हिंदी भाषी एकता परिषद, ठाणे' या संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी, २०१९ रोजी सायंकाळी ७ वाजता गडकरी रंगायतन, ठाणे (प.) येथे २६ व्या भव्य राष्ट्रीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे संयोजक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष अड. बी.एल.शर्मा व सह-संयोजक समाजसेवकी-उद्योगपति अरुण जोशी हे आहेत अशी माहिती आज पत्रकार परिषदेत दिली. 

    मागील २५ वर्षांपासून सातत्याने दरवर्षी होणा-या सदर कार्यक्रमात प्रत्येक वर्षी राष्ट्रीय पातळीचे कवी ठाण्यात येत असून या प्रसंगी समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजाविणा-या ३ व्यक्तींना संस्थेतर्फे प्रतिष्ठित पुरस्कार देऊन गौरविण्यात येतो. या पुरस्कारांमध्ये साहित्य-पत्रकारितेसाठी 'डॉ. हरिवंशराय बच्चन साहित्यरत्न पुरस्कार', देशाच्या संरक्षणासाठी आपले प्राण पणास लावून अदभूत अशी शूरविरता दाखविणा-या व्यक्तीस 'महाराणा प्रताप शौर्य पुरस्कार' आणि आपल्या अतुल्य कलागुणाने महाराष्ट्राच्या नावास देश-परदेशात लौकिक मिळवून देणा-या व्यक्तीस 'छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार' चा समावेश आहे, पत्रकार परिषदेत अशी माहिती देत अड शर्मा यांनी म्हटले की, यंदाच्या सत्कारमूर्तींमध्ये ज्येष्ठ पत्रकार (नवभारत टाइम्स) विमल मिश्र यांना 'डॉ. हरिवंशराय बच्चन साहित्यरत्न पुरस्कार', देशाच्या संरक्षणार्थ कश्मीर येथे अतिरेकींचा सामना करताना भारतमातेच्या सेवेत आपले प्राण अर्पित करणारे लष्कर दलाचे शहिद मेजर कौस्तुभ राणे यांना 'महाराणा प्रताप शौर्य पुरस्कार' तर नामवंत ज्येष्ठ अभिनेते सुबोध भावे यांना 'छत्रपति शिवाजी महाराज गौरव पुरस्कार' देऊन गौरविण्यात येणार आहे. 

      समारंभाचे उद्घाटन बंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ति कमळकिशोर तातेड व न्यायमूर्ति मकरंद कर्णिक यांच्या हस्ते दिप प्रज्ज्वलनाने करण्यात येईल. या प्रसंगी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर (आयपीएस) व कोकण निभागिय विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज (आयपीएस) हे विशेष पाहुणे तसेच ठाणे जिल्हा वकिल संघटनेचे अध्यक्ष अड. प्रकाश भोसले, 'राजस्थान पत्रिका' (मुंबई) चे संपादक डॉ. उरुक्रम शर्मा व ज्येष्ठ उद्योगपती-समाजसेवक अजिताभ बच्चन यांची कार्यक्रमात सम्माननिय पाहुणे म्हणून उपस्थिती लाभणार आहे. 

    सदर सोहळ्यात होणा-या राष्ट्रिय कवी संमेलनाचे सुत्र-संचालन ज्येष्ठ विनोदसम्राट कवी सत्यनारायण सत्तन हे करणार असून या प्रसंगी पद्मश्री डॉ. सुरेंद्र दुबे (रायपुर), प्रताप फौजदार (आगरा), आशीष 'अनल' (लखीमपुर-खीरी), गजेंद्र प्रियांशु (बाराबंकी), गौरव चौहान (इटावा), गौरव शर्मा (मुंबई) आणि डॉ. भुवन मोहिनी (उज्जैन) आदी मान्यवर कवी आपापल्या काव्यरचना सादर करतील.     

    कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी आयोजन समितीतील महेश जोशी, डॉ. सुशिल इन्दोरिया, अड. सुभाष झा, महेश बागड़ा, अशोक पारेख, राजेंद्र दाधीच, ए. एन. रुबिन, राजेंद्र शर्मा यांच्यासह संस्थेचे अनेक पदाधिकारी व सक्रिय कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत आहेत. प्रवेश विनामुल्य ठेवण्यात आलेल्या या समारंभात सर्व राष्ट्रभक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, शेवटी असे आवाहन शर्मा यांनी लोकांना केले आहे. 

Web Title: The 26th National Poetry Convention, which will be held on January 26 in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.