मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून २७ कोटी ५९ लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 05:57 AM2019-05-30T05:57:23+5:302019-05-30T05:57:32+5:30

इमारतीच्या बांधकामामध्ये पैसे गुंतवल्यास मोठ्या रकमेचा परतावा मिळू शकेल, असे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली.

27 crore 59 lakhs fraud by showing big returns | मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून २७ कोटी ५९ लाखांची फसवणूक

मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून २७ कोटी ५९ लाखांची फसवणूक

Next

ठाणे : इमारतीच्या बांधकामामध्ये पैसे गुंतवल्यास मोठ्या रकमेचा परतावा मिळू शकेल, असे आमिष दाखवून फसवणूक करण्यात आली.
याप्रकरणी दादरच्या विजय अग्रवाल (७१) यांची २८ कोटी ५९ लाख १९ हजारांची फसवणूक करणाऱ्या संजय व प्रतिमा भालेराव या दाम्पत्यासह इतरांविरुद्ध राबोडी पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. आता हे प्रकरण ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केले आहे.
अग्रवाल यांना २०११ ते २८ मे २०१९ या आठ वर्षांच्या काळात एस.डी. भालेराव कन्स्ट्रक्शन्स प्रा.लि., एस.डी. भालेराव असोसिएट्स आणि मेसर्स क्राउन बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स या कंपन्यांमध्ये बांधकाम व्यवसायासाठी २२ कोटी ६४ लाख ७५ हजार रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्याबाबत रजिस्ट्रेशन करून देण्यात आलेले रहिवासी आणि वाणिज्य गाळे हे बँक ऑफ इंडिया, पाचपाखाडी, ठाणे या बँकेकडे तारण ठेवलेले असतानाही ते आपल्याच मालकीचे असल्याचीही भालेराव यांनी बनावट कागदपत्रे तयार केली. तरीही, अग्रवाल यांच्याशी त्यांनी रजिस्ट्रेशन केले. तसेच अग्रवाल यांच्या गुंतवणुकीबाबत त्यांना तारण म्हणून दिलेले फ्लॅट आणि वाणिज्य गाळे वारंवार बदलून तेही दुसºयालाच विकून त्यांनी गुंतवणूक केलेल्या रकमेचा स्वत:च्या फायद्यासाठी वापर करून अपहार केला. त्यासाठी वारंवार अग्रवाल यांनी पाठपुरावा करूनही त्यांची मुद्दल २२ कोटी ६४ लाख ७५ हजार व व्याज मिळून २८ कोटी ५९ लाख १९ हजार ४७० रुपये परत न केल्याने त्यांनी राबोडी पोलीस ठाण्यात २९ मे रोजी फसवणूक आणि अपहाराची तक्रार केली. हे प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवल्याचे सूत्रांनी सांगितले.
>गुंतवणुकीस भाग पाडले
बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स या कंपन्यांचे मालक संजय आणि त्यांची पत्नी प्रतिमा भालेराव व त्यांच्या काही साथीदारांच्या संगनमताने चांगल्या परताव्याचे आमिष अग्रवाल यांना दाखवले.त्यांनी २०११ ते २८ मे २०१९ या आठ वर्षांच्या काळात एस.डी. भालेराव कन्स्ट्रक्शन्स प्रा.लि., एस.डी. भालेराव असोसिएट्स आणि मेसर्स क्राउन बिल्डर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर्स या कंपन्यांमध्ये बांधकाम व्यवसायासाठी २२ कोटी ६४ लाख ७५ हजार रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले.

Web Title: 27 crore 59 lakhs fraud by showing big returns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.