उल्हासनगर रेल्वे स्थानकात तरुणाला 27 लाखांच्या परकीय चलनासह अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 06:11 AM2018-03-21T06:11:05+5:302018-03-21T06:11:05+5:30
उल्हासनगर रेल्वे स्थानकात दुपारी एका १९ वर्षीय तरुणाकडून तब्बल साडे सत्तावीस लाख रुपयांचे परकीय चलन जप्त केले. पियुष कलवानी असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा नागपूरचा रहिवासी आहे.
उल्हासनगर : उल्हासनगर रेल्वे स्थानकात दुपारी एका १९ वर्षीय तरुणाकडून तब्बल साडे सत्तावीस लाख रुपयांचे परकीय चलन जप्त केले. पियुष कलवानी असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा नागपूरचा रहिवासी आहे.
उल्हासनगर रेल्वे स्थानकात एक तरुण परकीय चलन घेउन येणार असल्याची माहिती, रेल्वे पोलिसांना गुप्त माहितगार कडून मिळाली. त्या आधारे संशयित 19 वर्षाच्या तरुणाला ताब्यात घेउन झडती घेतली. यावेळी त्याच्या चपलेतून आणि बॅगच्या हँडलमधून डॉलर्सचा अक्षरशः खच पडला. यात अमेरिकन डॉलर, सिंगापूर डॉलर आणि कतारच्या चलनाचा समावेश आहे.
परकीय चलनाच्या नोटा आपण ठाणे येथील एका इसमाकडून घेऊन, नागपूरला नेत असल्याची कबुली तरुणाने ल रेल्वे पोलिसांना दिली. मात्र सकाळी साडेनऊ वाजता त्याला पकडून,कल्याण जीआरपी कार्यालयात नेल्याचे त्याने पोलिसाना सांगितले. परकीय चलन सापडल्यानंतरही, संध्याकाळपर्यंत साधा पंचनामा झाला नसल्याची बाब समोर आली आहे.