२७ गावांत आवाज संघर्ष समितीचाच
By admin | Published: November 3, 2015 01:17 AM2015-11-03T01:17:57+5:302015-11-03T01:17:57+5:30
बहुचर्चित २७ गावांनी शिवसेनेला अनपेक्षितपणे धक्का दिल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. संघर्ष समितीला मात्र अपेक्षेप्रमाणे विजय मिळाला असून शिवसेनेला केवळ ४ जागांवरच समाधान
- अरविंद म्हात्रे, चिकणघर
बहुचर्चित २७ गावांनी शिवसेनेला अनपेक्षितपणे धक्का दिल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. संघर्ष समितीला मात्र अपेक्षेप्रमाणे विजय मिळाला असून शिवसेनेला केवळ ४ जागांवरच समाधान मानावे लागले. संघर्ष समितीने १० जागांवर विजय मिळवून स्वतंत्र नगरपालिकेच्या बाजूने कौल मिळविल्याचे स्पष्ट झाले.
विजयी
उमेदवारांची यादी
२७ गावातील २१ जागांपैकी १७ जागांवर निवडणूका झाल्या तर २ बिनविरोध आणि दोन बहिष्कार होते. दोन बिनविरोध धरून १९ जागांवर निवडणूक झाली. एकूण २७ गावांतर्फे २१ जागांपैकी शिवसेनेच्या ४ जागा आणि बसपाची १ जागा वगळता १६ प्रभागांनी केडीएमसीच्या समावेशाविरुद्ध तर स्वतंत्र नगरपालिकेसाठी कौल दिला असल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले. त्यामुळे आता होणार काय? याकडे लक्ष लागले आहे.
27
गावांतील एकूण २१ जागांचे बलाबल
संघर्ष समिती पुरस्कृत एकूण
07
भाजपा
01
मनसे
02
संघर्ष समिती
04
समितीचा पाठिंबा
04
शिवसेना
02
बहिष्कार
01
बसपा
21
एकूण