जिल्ह्यातील १२३ ग्रामपंचायतींच्या २७२ जणांची बिनविरोध निवड
By admin | Published: October 28, 2015 12:46 AM2015-10-28T00:46:18+5:302015-10-28T00:46:18+5:30
जिल्ह्यातील १२३ ग्राम पंचायतींच्या ११२० जागांसाठी निवडणूक घेतली जात आहे. त्यापैकी २७२ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
ठाणे : जिल्ह्यातील १२३ ग्राम पंचायतींच्या ११२० जागांसाठी निवडणूक घेतली जात आहे. त्यापैकी २७२ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित तीन हजार ३९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्यासाठी १ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे. यातील १२२ ग्राम पंचायतींची सार्वत्रिक तर एकीची पोट निवडणूक आहे. त्यासाठी ४३६ मतदान केंद्र असून त्यावर १२३ निवडणूक निर्णय अधिकारी नेमले आहेत. भिवंडी, कल्याण, अंबरनाथ आणि मुरबाड या तालुक्यांमधील ग्रामपंचायतींच्या या निवडणूक पार पडणार . त्यातील ४१४ प्रभागांमधील ११२० जागांपैकी भिवंडी ६५, कल्याण- ३४, अंबरनाथ- १८ आणि मुरबाड- १५५ उमेदवार बिनविरोध आले आहेत. उर्वरितांसाठी मतदान होऊन ३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. अंबरनाथच्या १० ग्रामपंचायतीच्या ९६ पैकी १२ उमेदवार बिनविरोध आले आहेत. उर्वरित ८४ जागांसाठी निवडणूक होणार आहे. मुळगांव ग्रा. पं.च्या सात जागांवर उमेदवारी प्राप्त झाली नसून एक बिनविरोध निवडून आला आहे.