ठाण्यात २७५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; ६ जाणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 09:23 PM2021-02-06T21:23:21+5:302021-02-06T21:23:30+5:30
ठाणे शहर परिसरात ९५ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ५९ हजार ४७९ झाली आहे.
ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे २७५ रुग्ण शनिवारी आढळले आहेत. जिल्ह्यात आता दोन लाख ५५ हजार ४८४ रुग्णांची नोंद झाली. दिवसभरात सहा रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या सहा हजार १८० झाली आहे.
ठाणे शहर परिसरात ९५ रुग्ण आढळल्याने येथील रुग्ण संख्या आता ५९ हजार ४७९ झाली आहे. शहरात दोन मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या एक हजार ३६७ झाली. कल्याण - डोंबिवलीत ६८ रुग्णांची वाढ झाली असून दोन मृत्यू आहे. आता ६० हजार ५२९ रुग्ण बाधीत असून एक हजार १७७ मृत्यूची नोंंद आहे.
उल्हासनगरमध्ये सहा रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. येथील बाधितांची संख्या ११ हजार ६५८ झाली. तर, ३६८ मृतांची नोंद आहे. भिवंडीला एकही बाधीत नसून एकही मृत्यू नाही. आता बाधीत सहा हजार ७२८ असून मृतांची संख्या ३५४ आहे. मीरा भाईंदरमध्ये १४ रुग्ण आढळले असून एक मृत्यू आहे. या शहरात बाधितांची संख्या २६ हजार ३८० असून मृतांची संख्या ८०० आहे.
अंबरनाथमध्ये तीन रुग्ण आढळले असून एकही मृत्यू नाही. येथे बाधीत आठ हजार ६१३ असून मृत्यू ३१२ आहेत. बदलापूरमध्ये १४ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधीत नऊ हजार ४१७ झाले आहेत. या शहरात एक मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची संख्या १२५ आहे. ग्रामीणमध्ये नऊ रुग्णांची वाढ झाली असून एक मृत्यू नाही. आता बाधीत १९ हजार २५८ आणि आतापर्यंत ५८७ मृत्यू आहेत.