ठाणे जिल्ह्यात २९५ रुग्ण मंगळवारी आढळले; पाच जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 08:31 PM2021-02-16T20:31:32+5:302021-02-16T20:31:59+5:30
उल्हासनगरला पाच रुग्ण आढळले असून मृत्यू नाही. आता या शहरात ११ हजार ७१० बाधीत असून मृत्यू संख्या ३६८ आहे. भिवंडीला एक रुग्ण सापडला असून एकही मृत्यू नाही.
ठाणे : जिल्ह्यात कोरोनाचे २९५ रुग्ण मंगळवारी आढळून आले असून पाच जण दगावले आहेत. आता जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या दोन लाख ५८ हजार ३२५ झाली असून सहा हजार २०८ मृतांची संख्या झाली आहे. ठाणे शहरात ८८ रुग्ण सापडले आहेत. या शहरात आतापर्यंत ६० हजार २८९ रुग्ण नोंदले असून आज दोन मृत्यू आहे. त्यामुळे मृतांची संख्या एक हजार ३७३ झाली. कल्याण - डोंबिवलीत ५४ रुग्ण आढळून आले असून एकही मृत्यू नाही. या शहरात आता ६१ हजार २८४ बाधीत असून एक हजार १८४ मृत्यूची नोंद आहे.
उल्हासनगरला पाच रुग्ण आढळले असून मृत्यू नाही. आता या शहरात ११ हजार ७१० बाधीत असून मृत्यू संख्या ३६८ आहे. भिवंडीला एक रुग्ण सापडला असून एकही मृत्यू नाही. येथे सहा हजार ७४५ बाधितांची तर, ३५४ मृतांची नोंद आहे. मीरा भाईंदरला नऊ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. या शहरात आता २६ हजार ५९७ बाधितांसह ८०१ मृतांची संख्या आहे. अंबरनाथ शहरात सहा रुग्ण सापडले आहे. तर, एक मृत्यू आहे. या शहरात आता आठ हजार ६६० बाधितांसह मृतांची संख्या ३१३ नोंद आहे. बदलापूरला ३२ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बाधीत रुग्ण नऊ हजार ५९१ असून एकही मृत्यू नाही. तर मृत्यूची संख्या १२५ आहे. जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रात ११ रुग्ण सापडले असून एकही मृत्यू नाही. या गांवपाड्यांत १९ हजार ३४३ बाधीत झाले असून मृत्यू ५९१ नोंदले आहे.