29व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनला प्रारंभ, प्लॅस्टिक मुक्तीच्या संदेशासोबत अवयदान जनजागृतीसाठी धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2018 08:43 AM2018-09-02T08:43:31+5:302018-09-02T08:44:29+5:30
क्रीडा क्षेत्रात सर्वांचेच लक्ष वेधून घेणारी 29 वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन 2018 रविवार सकाळी सुरु झाली असून यावेळी नामवंत राष्ट्रीय खेळाडूंसह जवळपास 21 हजार स्पर्धक सहभागी झाले आहेत.
ठाणे: क्रीडा क्षेत्रात सर्वांचेच लक्ष वेधून घेणारी 29 वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन 2018 रविवार सकाळी सुरु झाली असून यावेळी नामवंत राष्ट्रीय खेळाडूंसह जवळपास 21 हजार स्पर्धक सहभागी झाले आहेत. यंदाच्या मॅरेथॉनमध्ये सहभागी स्पर्धक प्लॅस्टिक मुक्तीच्या संदेशासोबतच अवयदानाबाबतही जनजागृती करणार आहेत. महापालिका मुख्यालय चौकातून या स्पर्धेस प्रारंभ झाला असून गेली 28 वर्षे ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय धावपटूंचे आकर्षण ठरली आहेत. गेली 28 वर्ष सातत्याने वर्षा मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करणारी ठाणे महापालिका भारतातील एकमेव महापालिका आहे. या स्पर्धेमध्ये 21 कि.मी पुरूष गट आणि 15 कि.मी महिला गट व 10 कि.मी 18 वर्षावरील मुले (खुला गट) या तीन मुख्य स्पर्धेतील स्पर्धकांना टायमिंग चीप देण्यात आली आहे.
विविध 10 गटात स्पर्धा 21 कि.मी पुरूष गटातील स्पर्धेसाठी एकूण 20,0500/-रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. प्रथम क्रमाकांसाठी 75000/- रुपये, द्वितीय 45000/- रुपये, तृतीय 30,000/- रुपये , चतुर्थ 15000/- रुपये, पाचवे 10,000/- रुपये व6 ते 10 क्रमांकासाठीही रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.
15 कि.मी महिला गटातील स्पर्धेसाठी एकूण 1,50,500/- रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. प्रथम क्रमाकांसाठी 50,000/- रुपये, द्वितीय 30,000/- रुपये, तृतीय 20,000/- रुपये, चतुर्थ 15000/-रुपये,पाचवे 10,000/- रुपये तर 6 ते 10 क्रमाकांसाठीही रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.
10 कि.मी 18वर्षावरील मुले या स्पर्धेसाठी एकूण 94000 रुपयांची रोख पारितोषिके असून प्रथम क्रमांकासाठी 25000/- रुपये, द्वितीय 20,000/-रुपये, तृतीय 15000/-रुपये, चतुर्थ 10,000/- रुपये, पाचवे 7500/-रुपये असून 6 ते 10क्रमांकासाठीही रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.
10 कि.मी 18 वर्षाखालील मुले या स्पर्धेसाठी एकूण 94000 रुपयांची रोख पारितोषिके असून प्रथम क्रमांकासाठी 25000/- रुपये, द्वितीय 20,000/-रुपये, तृतीय 15000/- रुपये, चतुर्थ 10,000/- रुपये, पाचवे 7500/- रुपयेअसून 6 ते 10 क्रमांकासाठीही रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.
5 कि.मी मुले व मुली या स्पर्धेसाठी प्रत्येकी 38,500 रुपयांची रोख पारितोषिके असून प्रथम क्रमांकासाठी 8000/- रुपये, द्वितीय 6000/- रुपये, तृतीय 5500/- रुपये, चतुर्थ 5000रुपये, व पाचवे 4000 रुपये अशी पारितोषिके असून 6 ते 10 क्रमांकासाठीही रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.
3 कि.मी मुले व मुली व या स्पर्धेसाठी प्रत्येकी 28000 रुपयांची रोख पारितोषिके असून प्रथम क्रमांकासाठी 5500 रुपये, द्वितीय 5000/-रुपये, तृतीय 4500/ - रुपये, चतुर्थ 3500/-रुपये, पाचवे 3000 रुपये अशी पारितोषिके असून 6 ते 10 क्रमांकासाठीही रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.
ज्येष्ठ नागरिक गट : विजेत्यांची निशुल्क शारीरिक चाचणी
500 मीटर ज्येष्ठ नागरिक पुरूष व महिलांसाठी प्रत्येकी 15000 रुपयांची रोख पारितोषिके असून प्रथम क्रमाकांसाठी 5000/- रुपये, द्वितीय 4 हजार रुपये, तृतीय 3 हजार रुपये, चतुर्थ 2000 रुपये व पाचवे 1 हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या पहिल्या पाच ज्येष्ठ नागरिकांची संपूर्ण शारीकिर चाचणी ज्युपिटर रुग्णालयाच्यावतीने निशुल्क करण्यात येणार आहे.
रन फॉर इन्व्हायरमेंट
पर्यावरणप्रेमी रन फॉर इन्व्हायरमेंट या स्पर्धेत सहभागी होणार असून पर्यावरणाचे रक्षण करा असा संदेश देणार आहेत.
रन फॉर ऑर्गन डोनेशन
अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान असून अवयदानाची चळवळ व्यापक स्वरुपात समाजात पोहचावी यासाठी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयाचे 350 डॉक्टर्स सहभागी होणार असून अवयदानाबाबत जनजागृती करणार आहेत. तसेच मृत्युनंतर अवयवदान करणा-यांचे कुटुंबिय तसेच अवयवामुळे ज्यांना नवीन आयुष्य मिळाले आहे असे लाभार्थीही या स्पर्धेत धावणार आहेत