३ बाल मजुरांची सुटका करून तिघांना पकडले

By धीरज परब | Published: July 15, 2023 04:35 PM2023-07-15T16:35:28+5:302023-07-15T16:35:41+5:30

५ जणांवर  गुन्हा दाखल करून तिघांना ताब्यात घेत ३ बालकामगारांची सुटका केली आहे . 

3 child laborers were rescued and 3 arrested. | ३ बाल मजुरांची सुटका करून तिघांना पकडले

३ बाल मजुरांची सुटका करून तिघांना पकडले

googlenewsNext

मीरारोड - काशीमीरा भागातील औद्योगिक वसाहतीत धोकादायक कामास जुंपल्या प्रकरणी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षने ५ जणांवर  गुन्हा दाखल करून तिघांना ताब्यात घेत ३ बालकामगारांची सुटका केली आहे . 

पोलीस निरीक्षक समीर अहिरराव यांचे मार्गदर्शनाखाली उमेश पाटील,  विजय निलंगे, रामचंद्र पाटील, किशोर पाटील, चेतनसिंग राजपुत, केशव शिंदे, सम्राट गावडे, अश्विनी भिलारे, शितल जाधव, अश्वीनी वाघमारे यांच्या पथकाने कमलेश नगर,  ज्योती स्टील इन्डस्ट्रियलच्या १ ते ३ युनिट मध्ये छापा टाकला . कंपनीत १४ ते १७ वर्ष वयोगटातील ३ अल्पवयीनमुलांना  त्यांच्या जिवीतास धोका होईल अश्या पद्धतीने मोठ्या लोखंडी स्टील बार ऍसिड मध्ये टाकुन त्याची इलेक्ट्रीक मशीनवर कटिंग करुन क्रेनद्वारे ने आण व लोडींग करण्याचे काम बालमजुरांकडुन सक्तीने करवून घेतले जात होते . 

या प्रकरणी कंपनीचे सुपरवायझर सुमनकुमार सरगुन मंडल , द्विवेदी व जितेंद्रकुमार रामदौंड मौर्या, लेबर कॉन्ट्रक्टर मनोज व नमुद कंपनीचे मालक मनोज चड्डा ह्या ५ जणां विरुध्द भा.दं.वि.सं. , बाल व किशोरवयीन (प्रतिबंध) सुधारीत कायदा २०१६ , बाल न्याय अधिनियम अन्वये काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीतील तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे . 

 

Web Title: 3 child laborers were rescued and 3 arrested.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.