ठाण्यात सेप्टीक टँकमध्ये गुदमरुन 3 जणांचा मृत्यू तर 5 जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 07:49 AM2019-05-10T07:49:59+5:302019-05-10T07:50:13+5:30
सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील सेप्टीक टॅंकमध्ये गुदमरुन 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर इतर 5 जणांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.
ठाणे - सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील सेप्टीक टॅंकमध्ये गुदमरुन 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. तर इतर 5 जणांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. ठाण्यातील ढोकाळी परिसरात रात्री 12.30 च्या सुमारास ही दुर्घटना घडली.
दरम्यान ढोकाळी येथील सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील सेप्टीक टँकमध्ये 8 जण अडकल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या. 8 जणांचे जीव वाचविण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु झाले मात्र दुर्दैवाने यातील 3 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये अमित पुहाल(20), अमन बादल(21), अजय बुंबाक(24) या तिघांचा समावेश आहे. तर विरेंद्र हतवाल(25), मनजित वैद्य(25), जसबीर पुहाल(24), रुमेर पुहाल(30) आणि अजय पुहाल(21) या पाच जणांना वाचविण्यात यश आले आहे. या पाचही जणांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.
Maharashtra: 3 dead and 5 admitted to hospital after getting stuck in a sewage treatment plant in Dhokali, Thane.
— ANI (@ANI) May 9, 2019