ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ३ सुवर्ण, ४ रौप्य आणि २ कांस्यपदके, ठाणे मनपा प्रशिक्षण केंद्राचे सुवर्ण यश

By प्रज्ञा म्हात्रे | Published: October 19, 2022 05:59 PM2022-10-19T17:59:04+5:302022-10-19T17:59:32+5:30

Thane News: भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेच्यावतीने विभागीय स्तरावरील ॲथलेटिक चॅम्पियनशिप १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी प्रियदर्शनी पार्क, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती.

3 Gold, 4 Silver and 2 Bronze in Athletics Championship, Thane Municipal Training Center's Golden Success | ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ३ सुवर्ण, ४ रौप्य आणि २ कांस्यपदके, ठाणे मनपा प्रशिक्षण केंद्राचे सुवर्ण यश

ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये ३ सुवर्ण, ४ रौप्य आणि २ कांस्यपदके, ठाणे मनपा प्रशिक्षण केंद्राचे सुवर्ण यश

Next

- प्रज्ञा म्हात्रे
 ठाणे : भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेच्यावतीने विभागीय स्तरावरील ॲथलेटिक चॅम्पियनशिप १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी प्रियदर्शनी पार्क, मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ठाणे महापालिका प्रशिक्षण केंद्रातील खेळाडूंनी तीन सुवर्ण, चार रौप्य आणि दोन कांस्य पदके जिंकली.

मिहिका सुर्वे (१४ वर्षांखालील मुली) हिने वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटरमध्ये सुवर्णपदक, साईशा नायर (१४ वर्षांखालील मुली) हिने शॉट पुटमध्ये कांस्यपदक मिळवले. नतालिया फर्नांडिस (१७ वर्षांखालील मुली) हिने ४०० मीटर अडथळा शर्यतीत रौप्य पदक आणि १०० मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक तर श्रेष्ठा शेट्टीने (१७ वर्षांखालील मुली) लांब उडीत रौप्यपदक, अथर्व भोईर (१७ वर्षांखालील मुले) याने १०० मीटर आणि २०० मीटरमध्ये दोन्ही स्पर्धांमध्ये वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह रौप्य पदक मिळवले. मिहिका, नतालिया, श्रेष्ठ आणि अथर्व यांची बालेवाडी, पुणे येथे ४ ते ६ नोव्हेंबर या कालावधी दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

आपल्या यशाबद्दल मिहिका म्हणाली की, “मी माझ्या कामगिरीने खूप खूश आहे. पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत मी माझी कामगिरी सुधारण्याचा प्रयत्न करेन.” अथर्वने सांगितले की, “मला माझ्या कामगिरीने आत्मविश्वास वाटत आहे.”तर नतालियाने सांगितले की, “मी प्रथमच राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे. मला पाठिंबा देणाऱ्या माझ्या पालकांचे मी आभार मानतो”. श्रेष्ठने “मी विभागीय स्पर्धेत माझ्या कामगिरीवर खूश नव्हतो, पण मी प्रादेशिक स्पर्धेत चांगली कामगिरी केली आणि माझ्या पहिल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरलो”असे सांगितले. “सर्व खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. आम्ही प्रत्येक भेटीत सुधारणा करत आहोत. दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये विकासाचे काम सुरू असल्याने खेळाडूंनी काही प्रशिक्षण सत्रे चुकवली आहेत. या स्पर्धेत सर्वांनी वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी केली आहे. प्रशिक्षक म्हणून हे खूप समाधानकारक आहे. आम्ही कठोर परिश्रम करू आणि आगामी राष्ट्रीय स्पर्धेत चांगली कामगिरी करू.” असे प्रशिक्षक निलेश पाटकर यांनी सांगितले.

Web Title: 3 Gold, 4 Silver and 2 Bronze in Athletics Championship, Thane Municipal Training Center's Golden Success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.