उल्हासनगर हद्दपारीचें भंग करणाऱ्या ३ गुंडांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2022 11:44 PM2022-04-27T23:44:52+5:302022-04-27T23:45:01+5:30
याप्रकारने हद्दपार केलेल्या गावगुंडांचे मुक्काम पोस्ट उल्हासनगर असल्याची टीका सर्वस्तरातून होत आहे.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : सराईत गुंडावर हद्दपार कारवाईची हाफ संच्युरी करणाऱ्या पोलीस परिमंडळातील विट्ठलवाडी व उल्हासनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हद्दपारीचे उल्लंघन करणाऱ्या ३ गुंडांना मंगळवारी अटक केली. याप्रकारने हद्दपार केलेल्या गावगुंडांचे मुक्काम पोस्ट उल्हासनगर असल्याची टीका सर्वस्तरातून होत आहे.
उल्हासनगर पोलीस परिमंडळाचे पोलीस उपायुक्त सुभाष पठारे व सहायक पोलिस आयुक्त मोतीचंद राठोड यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन हद्दपार कारवाईची हाफ संच्युरी झल्याची माहिती दिली. या कारवाईने गावगुंडात भिती निर्माण झाली असून महापालिका निवडणुकीपूर्वी अनेक गावगुंड टार्गेटवर असल्याचे संकेत पठारे यांनी दिले. दरम्यान हद्दपारीची कारवाई झालेले अनेक गुंड शहरात राहून गुन्हे करीत असल्याचे यापूर्वीच्या कारवाईतून उघड झाले. मंगळवारी उल्हासनगर पोलिसांनी दुपारी साडे तीन वाजता हद्दपारीचे उल्लंघन करणाऱ्या प्रभुराज राजू पाटील उर्फ बाबू पाटील याला धारदार शस्त्रासह अटक करून गुन्हा दाखल झाला. तर शहर गुन्हे अन्वेषण विभागाने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हद्दपार कारवाई झालेल्या अविनाश सुब्रमण्यम नायडू याला कॅम्प नं-४ मद्रासी पाडा येथून रात्री साडे आठ वाजता अटक करून गुन्हा दाखल केला.
विठ्ठलवाडी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आशेळेगाव ओटी चौकातून हद्दपारीचे भंग करणाऱ्या स्वप्नील उर्फ सोन्या रवींद्र पाटील याला मंगळवारी रात्री आठ वाजता शस्त्रासह अटक करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला. एकाच दिवशी हद्दपारीचे उल्लंघन करणाऱ्या ३ गुंडाला शस्त्रासह पोलिसांनी अटक केल्याने, हद्दपार कारवाईवरच प्रश्नचिन्हे उभे ठाकले आहे. हद्दपार केलेले गुंड चरिमिरी देऊन शहरातच राहत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी पक्षाचे माजी शहर युवक अध्यक्ष विकास खरात यांनी करून याबाबत चौकशी करण्याची मागणी वारिष्टकडे करणार असल्याचे त्यांनी म्हटले.