नायजेरियनकडे ३ किलो इफेड्रीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2016 05:33 AM2016-08-30T05:33:59+5:302016-08-30T05:33:59+5:30

नवी मुंबईच्या कळंबोली भागातून अटक केलेल्या अमोबी ओसीटा उर्फ सॅम या नायजेरियन व्यक्तीच्या घरझडतीतून गुन्हे अन्वेषण विभागाने तीन किलो इफेड्रीनसह सुमारे सव्वा कोटीचे

3 kg of ephedrine to Nigerian | नायजेरियनकडे ३ किलो इफेड्रीन

नायजेरियनकडे ३ किलो इफेड्रीन

Next

ठाणे : नवी मुंबईच्या कळंबोली भागातून अटक केलेल्या अमोबी ओसीटा उर्फ सॅम या नायजेरियन व्यक्तीच्या घरझडतीतून गुन्हे अन्वेषण विभागाने तीन किलो इफेड्रीनसह सुमारे सव्वा कोटीचे अमलीपदार्थ हस्तगत केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एव्हॉन लाइफ सायन्सेस प्रा.लि. या कंपनीतून बाहेर काढलेले इफेड्रीन पुनीत श्रींगी असिकन्ननला देत होता. असिकन्ननने १२५ किलो इफेड्रीन अमोबी ओसीटा उर्फ सॅम या नायजेरियनला दिले. सॅमने अनेकदा केनियात त्याची तस्करी केली आहे. त्याव्यतिरिक्त काही माल त्याने सानपाडा येथील घरी ठेवला होता. त्याच्या घरातून २६ आॅगस्ट रोजी सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तीन किलो इफेड्रीन, ५५ ग्रॅम आइस ड्रग आणि मेफेड्रॉन असा सव्वा कोटीचा माल हस्तगत केला. नवी मुंबईतल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना तो हे ड्रग द्यायचा. तसेच दिल्लीमार्गे कार्गो विमानांनी आणि टांझानियाच्या हवाई वाहतुकीद्वारे केनियात पाठवत होता. एव्हॉनच्या जुन्या गोदामातून इफेड्रीन बाहेर काढले जायचे, अशी माहिती त्याने दिली होती. ठाणे पोलिसांनी जबाबाची खातरजमा केली, तेव्हा तो अत्यंत कडक सुरक्षा असलेल्या गोदामातून पुनीतच्या मदतीने अगदी सहज इफेड्रीन बाहेर काढत असल्याचे उघड झाले. 

Web Title: 3 kg of ephedrine to Nigerian

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.