ऑनलाईन फसवणुकीचे ३ लाख ८४ हजार पोलिसांनी मिळवून दिले

By धीरज परब | Published: March 14, 2024 04:23 PM2024-03-14T16:23:15+5:302024-03-14T16:23:15+5:30

भाईंदरच्या चौक गावातील जुनी बालवाडी शाळे जवळ राहणारे गिफ्टसन विजय मल्ल्या (२८ ) यांना इंस्टाग्राम तसेच मोबाईल क्रमांकावरून वर्क फ्रॉम होम ची माहिती अनोळखी व्यक्तींनी दिली . 

3 lakh 84 thousand police recovered from online fraud | ऑनलाईन फसवणुकीचे ३ लाख ८४ हजार पोलिसांनी मिळवून दिले

ऑनलाईन फसवणुकीचे ३ लाख ८४ हजार पोलिसांनी मिळवून दिले

मीरारोड - भाईंदरच्या चौक गावातील जुनी बालवाडी शाळे जवळ राहणारे गिफ्टसन विजय मल्ल्या (२८ ) यांना इंस्टाग्राम तसेच मोबाईल क्रमांकावरून वर्क फ्रॉम होम ची माहिती अनोळखी व्यक्तींनी दिली .  कंपनी व रेस्टॉरंट चे गुगल रिव्ह्यूचे स्क्रीन शॉट पाठविण्याचा टास्क देण्यात आला. टास्क पूर्ण केल्यास तसेच गुंतवणूक केल्या त्या बदल्यात मोठा परतावा मिळवून देण्याचे आमिष माल्या यांना दाखवले . त्यानुसार माल्या यांनी ३ लाख ८४ हजार रुपये अनोळखी व्यक्तींनी सांगितले प्रमाणे ऑनलाईन जमा केले होते. 

परंतु फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर माल्या यांनी गेल्या वर्षी उत्तन सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता .  वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादाराम करांडे , पोलीस निरीक्षक ऋषिकेश पवळ सह  हवालदार राजाराम आसवले व दिलीप सनेर यांनी तपास चालवला होता. तपासात फसवणुकीची रक्कम विविध बँक खात्यात गेली असल्याने पोलिसांनी पत्रव्यवहार व पाठपुरावा करत ती रक्कम गोठवण्यात आली . ठाणे  न्यायालयाचे आदेशानंतर माल्या यांना त्यांची फसवणूक झालेली संपूर्ण ३ लाख ८४  हजार रुपये इतकी रक्कम त्यांच्या खात्यात परत जमा करण्यात पोलिसांना यश आले. 

Web Title: 3 lakh 84 thousand police recovered from online fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.