ठाण्याच्या रस्त्यांवर आणखी २० तेजस्विनी बस; महिला प्रवाशांची गैरसोय दूर होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 12:18 AM2019-11-01T00:18:21+5:302019-11-01T00:18:49+5:30
महिला वाहकांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात
ठाणे : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या एक ते दोन दिवस आधी केवळ एकच तेजस्विनी बस ताफ्यात घेऊन तिचा लोकार्पण सोहळा सत्ताधारी शिवसेनेने उरकला होता. परंतु,आता येत्या दोन आवड्यात आणखी २० बस रस्त्यावर धावणार आहेत. शिवाय महिला वाहकांची भरती प्रक्रिया अंतिम टप्यात आली असून त्यांच्यासाठी चेंजिग रूम, टॉयलेट आदींची व्यवस्था करण्यासाठी आनंदनगर डेपोत काम सुरू करण्यात येणार आहे. एकूणच आता मागील दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या या बस खऱ्या अर्थाने रस्त्यावर धावणार आहेत.
शासनाकडून या बसच्या खरेदीसाठी ६ कोटींचे अनुदान यापूर्वीच मिळाले असून सर्व निविदा प्रक्रि यादेखील पूर्ण झाली आहे. महिलांच्या सुरिक्षततेच्या दृष्टीकोणातून राज्यातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि कल्याण-डोंबिवली या शहरांना एकूण ३०० तेजिस्वनी बस मिळणार आहेत. त्यापैकी ५० बस ठाणे शहराच्या वाट्याला आल्या आहेत. त्यानुसार विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या एक ते दोन दिवस आधी सत्ताधारी शिवसेनेने घाई गडबडीत एक बस दाखल करून घेऊन श्रेय लाटण्याचे काम केले होते.
आनंदनगर डेपोत महिला वाहकांसाठी सुविधा
खास महिलांच्या सुरिक्षतेतच्या दृष्टिकोनातून या बसेसची रचना केली आहे. या बसमध्ये वाहनचालक जरी पुरुष असले तरी वाहक मात्र महिला असणार आहेत. त्यानुसार या वाहक महिलांची भरती प्रक्रिया अंतिम टप्यात आली आहे. त्यानुसार या महिलांसाठी आनंदनगर डेपोमध्ये चेंजिग रूम, टॉयलेट आदींसह इतर कोणत्या सुविधा देता येऊ शकतात, याची पाहणी गुरुवारी व्यवस्थापक संदीप माळवी यांच्यासह इतर सहाकाऱ्यांनी केली आहे. त्यानुसार लवकरच त्याचेही काम सुरू होणार आहे. ज्या मार्गांवर महिला प्रवाशांची संख्या जास्त आहे, त्या मार्गांवर या बस सोडल्या जाणार आहेत. सकाळी आणि सांयकाळच्या सुमारास या बसेसच्या अधिक फेºया होणार आहेत.