Thane: कळवा हॉस्पिटलमध्ये एका दिवसांत ३ रुग्णांचा मृत्यू, उपचार न मिळाल्याने मृत्यू, नातेवाईकांचा आरोप

By अजित मांडके | Published: August 10, 2023 11:12 PM2023-08-10T23:12:15+5:302023-08-10T23:12:43+5:30

Thane: ठाणे महानगरपालिकेच्या कळवा रुग्णालयामधील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.  येथे एका दिवसात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

3 patients died in Kalwa Hospital in one day, death due to lack of treatment, relatives allege | Thane: कळवा हॉस्पिटलमध्ये एका दिवसांत ३ रुग्णांचा मृत्यू, उपचार न मिळाल्याने मृत्यू, नातेवाईकांचा आरोप

Thane: कळवा हॉस्पिटलमध्ये एका दिवसांत ३ रुग्णांचा मृत्यू, उपचार न मिळाल्याने मृत्यू, नातेवाईकांचा आरोप

googlenewsNext

- अजित मांडके
ठाणे  - ठाणे महानगरपालिकेच्या कळवा रुग्णालयामधील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.  उपचार न मिळाल्याने रविंद्र सहाने ( २२ )  सुग्रीव पाल ( ३०) आणि भाऊराव सुराडकर ( ४५ ) असे तीन जणांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, वेळेत उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यु झाला असल्याचा आरोप करत नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर आक्रोश करत गोंधळ घातला. तर एका रुग्णाला पोलिसांनीच रुग्णालयात दाखल केले होते. हा रुग्ण रस्त्यावर गंभीर अवस्थेत पडला होता. त्याचे नाव समजू शकलेले नाही.  घटनेची माहिती मिळताच आमदार जितेंद्र आव्हाड रुग्णालयांत पोहचले. आव्हाड यांनी रुग्णालय प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले.

ठाणे जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना वरदान ठरत असलेल्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालय आता मृत्यूचा आगार बनला आहे. कळवा हॉस्पिटलमध्ये उपचारच मिळत नसल्याची तक्रार रुग्णाच्या नातेवाईककडून केली जात आहे. एखाद्या रुग्णाला ऍडमिट करायचं असल्यास त्याच्याकडून मोबाईल चार्जिंगचे १००, आयसीयू बेड २०० तर ऑक्सिजन बेड २०० मागितले जात असल्याचा गंभीर आरोप रुग्णांच्या नातेवाइकानी केला आहे.

या तीनही केसमध्ये उपचार मिळाले नसल्याने आमचा रुग्ण दगावला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तर कळवा रुग्णालयाची रुग्ण ऍडमिट करून घेण्याची क्षमता संपली असून आयसीयू देखील फुल असल्याचे रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे.जे रुग्ण आले ते गंभीर अवस्थेत होते असा खुलासा प्रशासनाने केला आहे.

जितेंद्र आव्हाड भडकले 
आमदार जितेंद्र वाड्यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेत परिस्थिती जाणून घेतली. आव्हाड्यांच्या समोरच रुग्णाच्या नातेवाईकांनी आक्रोश केला. रुग्णालयात बेडवरतीच मृतदेह पडले असल्याचे पाहून जितेंद्र आव्हाड कळवा हॉस्पिटल मधील डॉक्टरवणार भडकले.

Web Title: 3 patients died in Kalwa Hospital in one day, death due to lack of treatment, relatives allege

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.