भिवंडीत ३ टन प्रतिबंधित मागुर मत्स्याससाठा नष्ट, तिघांवर गुन्हा दाखला; मत्स्य विभागाची कारवाई
By अजित मांडके | Published: April 19, 2023 05:17 PM2023-04-19T17:17:12+5:302023-04-19T17:17:25+5:30
३ कामगारांवर पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाने दिली.
ठाणे : भिवंडीतील कुंभारशीव या ठिकाणी वन विभागाच्या जागेत अनधिकृतपणे प्रतिबंधित मागुर मासेसंवर्धन करीत असल्याची महिती मत्स्यव्यवसाय विभागाला मिळाली होती. त्यानुसार मत्स्यव्यवसाय विभागाच्या पथकाने कारवाई करीत २८ तलावांपैकी ३ तलावंतील अनधिकृतपणे आढळून आलेला ३ टन मागुरसाठा शास्त्रोयुक्त पद्धतीने नष्ट केला आहे. तसेच ३ कामगारांवर पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाने दिली.
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील कुंभारशीव याठिकाणी वन विभागाच्या जागेवर मागुर माशाचे संवर्धन करीत असल्याची बाब ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या निदर्शनास आली. याची माहिती जिल्हाधिकरी यांनी मत्स्यस विभागास दिली. त्यांनी दिलेल्या माहिती नुसार मत्स्यविभागाने भिवंडीतील कुंभारशिव या ठिकाणी धडक दिली. यावेळी मागुर मस्त्यससंवर्धन हे वनविभागच्या जागेवर करीत असल्याचे दिसून आले. तसेच पश्चिम बंगाल येथे राहणारे सलाउद्दीन मंडल यांनी आदिवासींकडून भाडेतत्वावर हि जमीन घेवून अनधिकृतपणे मत्स्य संवर्धन करीत असल्याचे आढळून आले. त्यानुसार पडघा मंडळ अधिकरी यांच्यासह पोलीस बंदोबस्तात मत्स्यविभागाने कारवाई केली. यावेळी २८ तलावांपैकी ३ तलावांमध्ये अनधिकृतपणे आढळून आलेला ३ टन प्रतिबंधित मागुर साठा शास्त्रोयुक्त पद्धतीने जेसीबीच्या नष्ट करण्यात आला. तसेच तलावावर उपस्थित असलेल्या तीन कामगारांवर पडघा पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाने दिली.
राष्ट्रीय हरित लवाद यांच्या आदेशानुसार तलावात मागुर माशांचे संवर्धन व विक्री करण्यास बंदी आहे. परंतु, भिवंडी तालुक्यातील कुंभारशिव येथे वन विभागाच्या जागेवर अनधिकृतपणे मागुर माशाचे संवर्धन केल्याचे आढळून आल्याने ३ टन साठा नष्ट करण्यात आला असून तिघांच्या विरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय ठाणे- पालघर दिनेश पाटील यांनी दिली.