कोरोनाशी लढा देणारा ६५ वर्षीय योध्दा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 03:23 PM2020-04-15T15:23:06+5:302020-04-15T15:23:53+5:30
कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा जीवापाड मेहनत घेत आहेत, तर पोलीस यंत्रणा देखील यासाठी २४ तास सक्रीय असल्याचे दिसत आहे. परंतु त्यांच्या खांद्याला खांदा लावून कोपरीतील ६५ वर्षीय वृध्द देखील लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम करीत आहे.
ठाणे : पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरून थेट कोरोनाच्या संकटाशी युद्ध करीत आहे. २४ तास त्यांचा रस्त्यावर पहारा आहे. अशा प्रसंगी कोपरितील एक ६५ वर्षीय पोलीस मित्र देखील पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून या युद्धात उतरला आहे. पोलीस सांगतील त्या ठिकाणी हा पोलीस मित्र गळ्यात मेगा फोन आणि हातात जनजागृतीची पत्रके घेऊन लोकांना सावधानतेचा इशारा देत आहे. अडचणीत असलेल्या कुटुंबाला पोलिसांकडून मदत पोहचवीत आहे.
कोपरीतील श्रमदान सोसायटीत राहणारे शंकर बुकाने हे आंबेडकरी चळवळीतील सक्रीय समाजसेवक आहेत. अडचणीत सापडलेल्यांना मदत करणे हे त्यांचे आद्य कर्तव्य असल्याचे ते मानतात. कोपरीतील सगळ्या समाजकार्यात त्यांचा सहभाग असतो. त्यामुळे पोलिसांच्या शांतता मोहल्ला कमिटीवर ते कार्यरत आहेत. पोलीस मित्र म्हणून ते काम पाहतात. सध्या कोरोनाच्या पाशर््वभूमीवर राज्यात मोठे संकट उभे राहिले आहे. ठाण्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. कोपरीत या आजाराचा संसर्ग पसरू नये म्हणून इथली पोलीस यंत्रणा डोळ्यात तेल घालून नागरिकांना रस्त्यावर येण्यास मनाई करत आहेत. नाकाबंदी करून कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या कामात अनेक सामाजिक संघटना-व्यक्तींचा वाटा आहे. पोलीस मित्र असलेले शंकर बुकाने देखील मागे नाहीत. राज्यात लॉक डाऊन सुरू झाल्यापासून बुकाने वस्त्या वस्त्यांमध्ये जाऊन जागृतीचे काम करत आहेत. पोलिसांच्या सूचना - नियमांना लोकांपर्यंत पोहचवीत आहेत. बाजारात फिरून मेगा फोनवरून जनतेला सूचना देत आहेत. जनजागृती आणि पोलिसांच्या सूचनांची पत्रके लोकांना वाटत आहेत. या वयातही चालत जाऊन वस्त्यांमधील लोकांना शासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती देत आहेत. अनेकदा ते एकटेच मेगा फोन गळयात अडकवून लोकांना विविध संदेश देण्याचे काम करतात. अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी घराबाहेर आलेल्या लोकांना सुरक्षित अंतर ठेवण्याची विनंती करतात. भाजीपाला बाजार, किराणा दुकानांसमोर होणाºया गर्दीला शिस्त लावण्याचे काम करतात.
पोलिसांनी योग्यवेळी योग्य खबरदारी घेतल्याने कोपरी ग्रीन झोनमध्ये आहे. राज्यात संचारबंदी आणि देशात लॉक डाऊन सुरू होताच कोपरी पोलिसांनी पहिल्या दिवसापासूनच चोख बंदोबस्त लावून लोकांना घराबाहेर पडू दिले नाही. अत्यावश्यक वस्तूंच्या दुकांनदारांनाही शिस्त लावण्याचे काम केले. भाजी बाजार आणि अत्यावश्यक वस्तूंची बेशीस्त विक्र ी होऊ दिली नाही. बाजारांचे योग्य नियोजन केले. त्यामुळे कोपरी कोरोनामुक्त ठेवण्यात पोलिसांची महत्वाची भूमिका आहे. आपले कर्तव्य आहे म्हणून मी सुद्धा जनसेवा करतो आहे.
- शंकर बुकाने, पोलीस मित्र