ठाणे जिल्ह्यातील ३०० उमेदवारांकडून ३७२ उमेदवारी अर्ज ; उद्या छाननी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2019 07:09 PM2019-10-04T19:09:17+5:302019-10-04T19:19:57+5:30

जिल्ह्यातील १८ विधानसभेच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत ३७० उमेदवारी प्राप्त झाले आहे. या प्राप्त अर्जांची छाननी ५ आॅक्टोबरला आहे. तर ७ आॅक्टोबरला उमेदवारी मागे घेण्याची संधी देण्यात आली

300 candidates from 372 applications in Thane district; Scrutiny tomorrow | ठाणे जिल्ह्यातील ३०० उमेदवारांकडून ३७२ उमेदवारी अर्ज ; उद्या छाननी

आतापर्यंत ३०० उमेदवारांनी ३७० उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

Next
ठळक मुद्देमुंब्रा कळवामध्ये २३ उमेदवारांनी २३ अर्ज दाखल केलेडोंबिवली मतदारसंघात आठ उमेदवारांचे आठ अर्जबेलापूरला २१ उमेदवारांचे २२ अर्ज

ठाणे : जिल्ह्यातील १८ विधानसभा निवडणुकीसाठी आजच्या शेवटच्या दिवशी २१९ उमेदवारांनी त्यांचे २७० उमेदवारी अर्ज दाखल केले. यासह आतापर्यंत ३०० उमेदवारांनी ३७० उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या प्राप्त अर्जांची छाननी ५ आॅक्टोबरला आहे. तर ७ आॅक्टोबरला उमेदवारी मागे घेण्याची संधी देण्यात आली आहे.
         जिल्ह्यातील १८ विधानसभेच्या निवडणुकीसाठी आतापर्यंत ३७० उमेदवारी प्राप्त झाले आहे. यापैकी आतापर्यंत भिवंडी ग्रामीणला १३ उमेदवारांकडून १५ अर्ज दाखल झाले आहेत. तर शहापूरला १४ जणांनी १८ अर्ज दाखल केले आहेत. भिवंडी पश्चिममधून ११ उमेदवारांनी १८ अर्ज भरले आहेत. भिवंडी पूर्वमध्ये १९ उमेदवारांनी २५ अर्ज भरले आहेत. तर कल्याण पश्चिमला २४ जणांनी ३२ अर्ज दाखल केले. मुरबाडला आठ जणांचे ११ अर्ज आले. अंबरनाथमध्ये २० जणांचे २३ अर्ज, उल्हासनगला २४ जणांचे ३२ उमेदवारी अर्ज तर कल्याण पूर्वमध्ये २० उमेदवारांनी २३ अर्ज भरले आहेत.

           डोंबिवली मतदारसंघात आठ उमेदवारांचे आठ अर्ज आले आहेत. कल्याण ग्रामीणमध्ये २२ उमेदवारांचे २६ अर्ज आहेत. मीरा भार्इंदरला २२ उमेदवारांचे ३२ अर्ज आहेत.ओवळा माजीवडामध्य १६ उमेदवारांचे १९ अर्ज आहे. कोपरी पाचपाखाडीत ११ जणांचे १४ उमेदवारी अर्ज आले. ठाणेत ९ जाणांनी १२ अर्ज भरले. मुंब्रा कळवामध्ये २३ उमेदवारांनी २३ अर्ज दाखल केले तर ऐरोलीत १५ उमेदवारांनी १९ अर्ज दाखल केले आणि बेलापूरला २१ उमेदवारांचे २२ अर्ज शेवटच्या दिवसापर्यंत आले आहेत.

Web Title: 300 candidates from 372 applications in Thane district; Scrutiny tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.