२९ तलावांसाठी ३१ कोटी, मिळणार नवसंजीवनी, ठाण्याची ओळख पुन्हा होणार जलसमृद्ध  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 06:10 AM2017-09-16T06:10:33+5:302017-09-16T06:10:48+5:30

 31 crores for 29 ponds, Navsanjivani, Thane's identity will be renewed | २९ तलावांसाठी ३१ कोटी, मिळणार नवसंजीवनी, ठाण्याची ओळख पुन्हा होणार जलसमृद्ध  

२९ तलावांसाठी ३१ कोटी, मिळणार नवसंजीवनी, ठाण्याची ओळख पुन्हा होणार जलसमृद्ध  

Next

ठाणे : ठाण्यातील तलावाच्या दुरवस्थेची व्यथा लोकमतने ‘काहीतरी कर ठाणेकर’ या चळवळीच्या माध्यमातून मांडली होती. त्यानंतर, पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या तलावांचा विकास आराखडा तयार करण्यास संबंधित विभागाला आदेश दिले होते. त्यानुसार, शहरातील ३७ पैकी २९ तलावांना सुमारे ३१ कोटी खर्चून नवसंजीवनी देण्याचा निर्णय ठाणे पालिकेने घेतला आहे. तसा प्रस्ताव २० तारखेच्या महासभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
ठाणे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. मात्र, मागील काही वर्षांत या शहराची ही ओळख पुसली जाऊ लागली आहे. शहरात ६५ तलाव होते. परंतु, आजघडीला ३७ तलाव शिल्लक आहेत. त्यातही यातील काही ठरावीक तलावांसाठी पालिका वर्षानुवर्षे निधी खर्च करत आहे. इतर तलावांकडे मात्र दुर्लक्ष केले जाते, अशी नेहमीच ओरड होते. याच मुद्याला धरून लोकमतने ‘काहीतरी कर ठाणेकर’ या चळवळीच्या माध्यमातून या तलावांची व्यथा ठाणेकरांसह राजकीय मंडळी आणि प्रशासनापुढेदेखील मांडली होती. तलावांना पुनरुज्जीवन देण्यासाठी रायलादेवी तलावाच्या ठिकाणी याच माध्यमातून एका कार्यक्रमाचे आयोजनही केले होते. अखेर, पालिकेने या तलावांना नवसंजीवनी देण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार, शहरातील ३७ पैकी २९ तलावांचा कायापालट करण्यात येणार आहे. यामध्ये आंबेघोसाळे, खारेगाव, खर्डी, खिडकाळी, डावला, देवसर, रेवाळे, कोलशेत, शीळ, तुर्फेपाडा, देसाई, फडकेपाडा, कासारवडवली, कळवा शिवाजीनगर, कौसा, ब्रह्माळा, कावेसर, मुंबे्रश्वर, दातिवली, नार, डायघर, दिवा, जोगिला, बाळकुम, गोकूळनगर, रायलादेवी, ओवळा, आगासन या तलावांचा समावेश आहे. या ठिकाणी तलावाच्या परिसरात आवश्यकतेनुसार टो वॉल, पिचिंग, एज वॉल, कुंपण भिंत व रेलिंग, जॉगिंग ट्रॅक, नूतनीकरण, गाळ काढणे, नवीन बैठकव्यवस्था व गझिबो, विसर्जन घाट, परगोला, थीम पेंटिंग आदी कामे करण्याचे प्रस्तावित केले आहे.
याशिवाय, तलावाभोवती विद्युत दिवे बसवणे, मध्यभागी कारंजा, लॉन बसवणे, छोटीमोठी झाडे लावून परिसराचे सुशोभीकरण, ड्रीप इरिगेशन व्यवस्था करणे, स्त्री व पुरुषांकरिता स्वतंत्र शौचालये, आवश्यकतेनुसार आॅनलाइन मॉनिटरिंग साहित्य बसवणे, जेटिंग मशीनच्या साहाय्याने जॉगिंग ट्रॅकची साफसफाई करणे आदी कामे केली जाणार आहेत.

 थुईथुई नाचणारी कांरजी बसवणार

सुशोभीकरणांतर्गत तलावांच्या परिसरात बर्ड नेस्ट लावणे, विविध माहिती फलक बसवणे, व्हिल टाइप एरेटर लावणे, फ्लोटिंग आर्ट तयार करणे, ड्रिप इरिगेशनची व्यवस्था करणे अशी कामे केली जाणार आहे. तसेच संगीताच्या तालावर थुईथुई नाचणारी कारंजी, मिस्ट पद्धतीचे कारंजे बसवण्याचे कामही होणार आहे. प्रोमिनेडचे रुंदीकरण व नूतनीकरण करण्याची कामे केली जाणार आहेत.
या कामासाठी ३० कोटी ८८ लाख ५२ हजार ४८० इतका खर्च अपेक्षित आहे. तो जाल्यास येत्या काळात ठाण्यातील दुर्लक्षित राहिलेल्या तलावांनादेखील नवसंजीवनी मिळणार आहे.

Web Title:  31 crores for 29 ponds, Navsanjivani, Thane's identity will be renewed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.