ठाणे जिल्हयात ३२ हजार गणरायांचे विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 08:57 PM2018-09-24T20:57:07+5:302018-09-24T21:11:19+5:30

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत करुन ठाण्यातील बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळांनी डॉल्बीचा दणदणाट न करता ढोल ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला.

32 thousand Ganesha's immersion in Thane district | ठाणे जिल्हयात ३२ हजार गणरायांचे विसर्जन

ठाणे जिल्हयात ३२ हजार गणरायांचे विसर्जन

googlenewsNext
ठळक मुद्देन्यायालयाचा मान राखत डीजेला निरोपढोलताशांचा गजरसोमवारी पहाटेपर्यंत झाले विसर्जन

ठाणे : डॉल्बी अर्थात डीजेचा दणदणाट न करता ढोलताशांच्या गजरात ठाण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या लाडक्या गणरायाचे अनंत चतुर्दशीला भावपूर्ण विसर्जन केले. यंदाही घरगुती श्रींच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. सोमवारी पहाटेपर्यंत ७५० सार्वजनिक, तर ३१ हजार ७१६ घरगुती गणरायांचे शांततेत विसर्जन झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दहा दिवसांच्या गणरायांचे विसर्जन होण्यापूर्वीच न्यायालयाने विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या वापरावर निर्बंध आणल्यामुळे काही मंडळांनी नाराजी, तर काहींनी या निर्णयाचे स्वागत केले. याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेश मंडळे विसर्जन मिरवणुका कशा काढतात, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले होते. परंतु, ठाण्यात विसर्जन मिरवणुका निघण्यापूर्वी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सार्वजनिक गणेश मंडळांची एक बैठक घेतली होती. याच बैठकीमध्ये डीजेला परवानगी देणार नसल्याचे स्पष्ट केले होते. सहआयुक्त मधुकर पांडेय यांनीही तसे आदेश काढले होते. तर, पोलीस ठाण्यांच्या पातळीवर झालेल्या बैठकीत डीजेचालकांनाही डीजेवरील बंदीचे आदेश दिले होते. डीजेबंदीचे ठाण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी स्वागत केले. त्यामुळे ठाणे, वागळे इस्टेट, भिवंडी, उल्हासनगर, डोंबिवली, अंबरनाथ आणि बदलापूर अशी कुठेही डीजेच्या दणदणाटात विसर्जन मिरवणूक निघाली नाही. केवळ कल्याणमधील एका मंडळाने डीजे नसेल, तर विसर्जन करणार नाही, असा पवित्रा घेतला होता, पण हा वादही नंतर निवळल्याचे पोलीस आयुक्त फणसळकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
ठाणे शहर परिमंडळ-१ मध्ये खारेगाव पारसिक रेतीबंदर विसर्जन घाट, मासुंदा तलाव आदी कृत्रिम तलावांमध्येही पाच हजार ३०८ गणरायांचे विसर्जन झाले. शहरात १०१ सार्वजनिक गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. तर, वागळे इस्टेट या परिमंडळ-५ मध्ये उपवन तलाव, कोलशेत खाडी तसेच रायलादेवी आणि उपवन येथील कृत्रिम तलावांमध्ये चार हजार १६१ खासगी, तर १५२ मूर्तींचे विसर्जन झाले. कल्याणमध्ये १६९ सार्वजनिक, तर नऊ हजार ६११ खासगी गणरायांचे विसर्जन झाले. याशिवाय, भिवंडीतील नदीनाका, वºहाळादेवी घाट, काल्हेर खाडी आदी ठिकाणी १२९ सार्वजनिक आणि २५३० खासगी मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तसेच उल्हास नदी आणि मोहना घाट याठिकाणी परिमंडळ-४, उल्हासनगरातील १८८ सार्वजनिक, तर १० हजार १०६ श्रींच्या मूर्तींचे विसर्जन शांततेत पार पडले. ठाण्यात रेतीबंदर खाडी येथे अखेरच्या सार्वजनिक गणरायाच्या मूर्तीचे सोमवारी पहाटे ५ वाजता, तर कल्याणमध्ये सोमवारी ६ वाजेपर्यंत विसर्जन सुरूहोते.
ठाण्यासह संपूर्ण पोलीस आयुक्तालय परिसरात सात ते आठ हजार पोलीस गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी तैनात होते. किरकोळ घटना वगळता कुठेही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
..............................

Web Title: 32 thousand Ganesha's immersion in Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.