भिवंडीत भरारी पथकाकडून ३३१६०९ रुपयांचा मुद्देमाल जप्त
By सुरेश लोखंडे | Published: October 27, 2024 08:47 PM2024-10-27T20:47:03+5:302024-10-27T20:47:15+5:30
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.
ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. त्यानुसार भिवंडी पश्चिमचे भरारी पथक व नारपोली पोलीसांच्या संयुक्त कारवाईत संशयित वाहनांमध्ये तीन लाख ३१ हजार ६०९ रुपयांचा मुद्देमाल विनातपशील आढळला. त्यांमध्ये चांदी व चांदी चे काम असलेल्या वस्तूंचा समावेश आहे. या वस्तूंच्या तपासणी दरम्यान संबंधित बील पावत्या नसल्याने या भरारी पथकाने धड़क कारवाई करीत हा मुद्देमाल जप्त केला आहे, याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.
रविवारी पहाटे ३ वाजता केलेल्या या संयुक्त कारवाईत एक संशयित वाहन ताब्यात घेण्यात आले. या वाहनामध्ये असलेल्या सामानाबाबत पोलिसांनी चौकशी केली असता वाहनचालक व गाडीतील इतर कर्मचाऱ्याना सामानाबाबत कोणतीही माहिती देता न आल्याने पोलिसांनी ही गाडी नारपोली पोलीस ठाण्यात आणली. पोलीस व भरारी पथकातील कर्मचाऱ्यांनी गाडीतील साहित्य कुरिअर एजन्सीचे मालक व पंचासमक्ष गाड़ी तुन खाली उतरावला. संशयित वाहनातून एकंदर ७३ छोटे मोठे बॉक्स मधील साहित्य व त्या साहित्याच्या बिलाची तपासणी केली.
या वाहनामध्ये असलेल्या ७२ बॉक्स मधे सोने, चांदी व गिफ्ट आर्टिकल असलेले एकंदरीत दोन दोन कोटी आठ लाख सतरा हज़ार आठशे वीस रुपये चा मुद्देमाल सापडला. तपासणी दरम्यान संबंधित कुरिअर चालकाने बॉक्सनिहाय त्यात समाविष्ट असणाऱ्या साहित्य व तपशील असणारे पक्के बिल सादर केले व अनुषंगिक खात्री पंचासमक्ष व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आले. त्यानुसार एकूण ६० बॉक्स मध्ये असलेल्या सोने व चांदी चे गिफ्ट आर्टिकल दोन कोटी चार लक्ष ८६ हजार २१७ रुपयांचे चे बिल सादर केले. मात्र उर्वरित बॉक्समध्ये असलेल्या तीन लक्ष ३१ हजार ६०९ रुपयांच्या मुद्देमालातीऋल चांदी व चांदी चे काम असलेले गिफ्ट आर्टिकलचे बिल संबंधितास सादर करता आले नाही. त्यामुळे या वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.