लॉकडाऊनमध्ये १८ दिवसात ३३६ घरांची नोंदणी, १४ कोटींचा महसुल गोळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2020 03:31 PM2020-06-10T15:31:25+5:302020-06-10T15:31:49+5:30
लॉकडाऊन नंतर शिथील झालेल्या नियमांमुळे ठाणे जिल्ह्यातील उपनिंबधक कार्यालये देखील सुरु झाली आणि त्यानुसार १८ दिवसात या कार्यालयाअंतर्गत ३३६ नव्या घरांची नोंदणी झाली आहे. तसेच या पोटी सुमारे १४ कोटींचा महसुल गोळा झाला आहे.
ठाणे : कोरोनामुळे सर्व अर्थव्यवस्था कोलमडून पडली असतांना घर खरेदी विक्रीवर देखील याचा परिणाम झाल्याचे दिसून आले होते. परंतु मागील १८ दिवसात तब्बल ३३६ नव्या घरांची नोंदणी झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या या टाळेबंदीच्या काळात ठाणे जिल्हा नोंदणी कार्यालयाअंतर्गत १८ दिवसात १४ कोटींच्या आसपास महसुल गोळा झाला आहे.
कोरोनामुळे मार्च २१ पासून टाळेबंदी लागू झाली होती. त्याचा परिणाम संपूर्ण देशात दिसून आला. प्रत्येक घटकाला याचे परिणाम भोगावे लागले आहेत. यातून बांधकाम व्यावसायिकही सुटु शकलेला नाही. इमारती तयार असतांनाही बुकींग नसल्याने बांधकाम व्यावसायिक देखील संकटात आले होते. परंतु आता कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये थोडी थोडी शिथिलता आल्याने बांधकाम व्यावसायिकांना देखील थोडेसे हायसे वाटले आहे. मुंबई शहराच्या वेशीवर असलेल्या ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर आदी कमी दारात व निसर्गाच्या सानिध्यात घरे उपलब्ध होत आहे. तसेच ही घरे ग्राहकांच्या पसंतीस देखील उतरत आहेत. यामुळे या शहरांमध्ये घरे घेण्यासाठी नागरिकांच्या ओढा वाढत आहे. त्यामुळे नव्या घरांच्या गुंतवणूकीसाठी अनेकजण ठाणे जिल्ह्याला अधिक पसंती देत आहेत. मार्च महिन्याच्या सुरु वातीला काही जणांनी नवीन घरांच्या खरेदी केली होती. मात्र, मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाच्या पाशर््वभूमीवर संपूर्ण देशभरात टाळेबंदी करण्यात आली. यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले होते. त्याचा परिणाम घरांच्या नोंदणी प्रक्रि येवर देखील झाला होता. कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे एप्रिल महिन्यात एकही नोंदणी करण्यात आली नाही. तर मे महिन्याच्या १३ तारखेला जिल्हा दुय्यम निबंधक कार्यालयाच्यावतीने जिल्ह्यातील १७ कार्यालयांपैकी ठाणे, कल्याण, मीरा-भार्इंदर आणि कोकणभवन ही चार कार्यालये प्रायोगिक तत्वावर सुरु केली. यावेळी १३ मे ते १६ मे या तीन दिवसाच्या कालावधीत या कार्यालयांमध्ये १६८ नवीन घरांची नोंदणी करण्यात आली. यामध्ये ठाणे महापालिका हद्दीतील ११४, नवी मुंबई हद्दीत १८, मीरा-भार्इंदर २२ आणि कल्याण तालुक्यातील ५ घरांच्या नोंदणीचा समावेश आहे. त्यांनतर १६ मे पासून जिल्ह्यातील ठाणे तालुका हद्दीतील १२ आणि कल्याण तालुक्यातील ५ अशी एकुण १७ नोंदणी कार्यालये सुरु करण्यात आली. त्यामुळे १३ मे ते ३१ मे या १८ दिवसांच्या कालावधीत एकुण ३३६ नव्या घरांची नोंदणी झाली असून त्या माध्यमातून जिल्हा नोंदणी कार्यालयाला १३ कोटी ८१ लाखांचा महसूल मिळाला असल्याची माहिती सहजिल्हा निबंधक (वर्ग -२) ठाणे शहर तानाजी गंगावणे यांनी दिली. दरम्यान, कोरोनाच्या पाशर््वभूमीवर घरांच्या नोंदणीसाठी कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाकडून सोशल डीस्टंगसीचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले असून नोंदणीसाठी लागणारे हाताचे ठसे घेण्यात येणाºया मशीनचे निर्जंतुकीकरणही केले जात आहे.