मुंबई-पनवेल रोडजवळील भीषण आगीत ३५ गोदामे खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 02:00 AM2019-05-16T02:00:59+5:302019-05-16T02:01:11+5:30
जुन्या मुंबई -पनवेल रोड जवळील भंडार्ली गावाच्या मागे असलेल्या गौसिया मार्केटमधील गोदामांना बुधवारी दुपारी भीषण आग लागली.
मुंब्रा : जुन्या मुंबई -पनवेल रोड जवळील भंडार्ली गावाच्या मागे असलेल्या गौसिया मार्केटमधील गोदामांना बुधवारी दुपारी भीषण आग लागली. या आगीत प्लास्टिक तसेच इतर टाकाऊ वस्तू जमा करून ठेवलेली ३० ते ३५ गोदामे खाक झाली. यामुळे अनेक दुचाकींसह चार कार जळून खाक झाल्या आहेत.
यासह गोदामांची मोठी वित्तीयहानी झाली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी वा कुणीही जखमी झाले नाही. मात्र,
रात्री उशीरापर्यंत येथील आग धुमसत होती.
येथील प्लास्टिकचे मोती बनवण्याच्या एका कारखान्यांमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे त्या कारखान्याला प्रथम आग लागल्याची माहिती स्थानिकांनी दिली. त्यानंतर प्लास्टिकमुळे आगीने रौद्र रु प धारण केले.
त्यामुळे त्याची झळ आजूबाजूच्या ३० ते ३५ गोदामांना बसली. रात्री उशिरापर्यंत घुमसत असलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न कंळबोली, नवीन पनवेल, वाशी, ऐरोली, तळोजा एमआयडीसी येथील अग्निशमन दलाचे जवान १० फायर इंजिन तसेच टँकरच्या सहाय्याने करीत असल्याची माहिती कंळबोली अग्निशमन दलातील कर्मचाऱ्याने लोकमतला दिली.