‘उद्यान’मध्ये सापडले ३६ लाख

By Admin | Published: May 12, 2017 01:31 AM2017-05-12T01:31:33+5:302017-05-12T01:31:33+5:30

बेंगरुळहून सीएसटीकडे जाणाऱ्या उद्यान एक्स्प्रेसमधील एक बेवारस बॉक्समध्ये ३६ लाख ३० हजार रुपयांची रोकड आढळली.

36 million found in 'garden' | ‘उद्यान’मध्ये सापडले ३६ लाख

‘उद्यान’मध्ये सापडले ३६ लाख

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : बेंगरुळहून सीएसटीकडे जाणाऱ्या उद्यान एक्स्प्रेसमधील एक बेवारस बॉक्समध्ये ३६ लाख ३० हजार रुपयांची रोकड आढळली. ही घटना बुधवारी सायंकाळी पावणे सात वाजता कल्याण रेल्वे स्थानकात घडली.
उद्यान एक्सप्रेसमधील तिकीट तपासनीस एस. एस. भानुशाली यांना ‘बी-वन’ या डब्यात तिकीट तपासत असताना एक बेवारस बॉक्स सापडला. त्याची माहिती त्यांनी रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांना दिली. रेल्वेचे अधिकारी माणिक माने व विनिता शुक्ला यांनी तो तपासला असता त्यात ही रक्कम सापडली. त्यात दोन हजार, पाचशे व शंभर रुपयांच्या नोटा होत्या. हा बॉक्स डब्यात कसा आला, कुणी ठेवला याचा तपास पोलीस करत आहेत.

Web Title: 36 million found in 'garden'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.