३६१ शाळा होणार बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 02:14 AM2017-07-18T02:14:34+5:302017-07-18T02:14:34+5:30

ठाणे जिल्ह्यात ३० पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या ३६१ शाळा कोणत्याही क्षणी बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याचा अध्यादेश लवकरच जारी होणार

361 schools going to be closed! | ३६१ शाळा होणार बंद!

३६१ शाळा होणार बंद!

Next

- सुरेश लोखंडे । लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाणे जिल्ह्यात ३० पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या ३६१ शाळा कोणत्याही क्षणी बंद करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याचा अध्यादेश लवकरच जारी होणार असल्याचे शिक्षण खात्यातील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे शिक्षक आणि अन्य कर्मचारी हादरले आहे.
या शाळेतील मुलांची जवळच्याच अन्य शाळांत व्यवस्था करण्यात येणार असून त्यांच्या प्रवासाचा खर्च सरकार करणार आहे. मात्र शिक्षकांच्या पगारापेक्षा तो खर्च कमी असल्याचा अधिकाऱ्यांचा दावा आहे. या आधी नोव्हेंबर २०११ मध्ये सरकारने राज्यातील सर्व शाळांची पटनोंदणी केली होती.
ठाणे जिल्ह्याच्या शहरी, ग्रामीण व आदिवासी भागात ३० विद्यार्थ्यांपेक्षा कमी पटसंख्येच्या ३६१ शाळा आहेत. यातील शिक्षकांचे वेतन व व्यवस्थापन यावर विद्यार्थ्यांच्या तुलनेत जास्त खर्च होत आहे. तो टाळण्यासाठी या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी जिल्ह्यातील शाळांच्या पटसंख्या पडताळणीचे काम हाती घेतले. त्यात शाळांची नेमकी संख्या समोर आली.
पटपडताळणीचे काम पूर्ण झाल्याावर शाळांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या शाळांत दोन लाख विद्यार्थी बोगस असल्याचे आढळले. यामुळे अशा शाळेतील शिक्षकांचे धाबे दणाणले आहे. यात ठाणे, अंबरनाथ, उल्हासनगर, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भार्इंदर, मुरबाड, शहापूर, कल्याण, भिवंडी पालिका, भिवंडी ग्रामीणमधील माध्यमिक, प्राथमिक शाळांचा समावेश आहे.
सध्या या शाळांत ६० विद्यार्थ्यांसाठी दोन शिक्षक कार्यरत आहेत. त्यांच्या वेतनाच्या तुलनेत शाळांची गुणवत्ता नाही, विद्यार्थी संख्याही कमी आहे. घटती आहे. यामुळे या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे संबंधित शाळेच्या विद्यार्थ्यांना जवळची चांगली शाळा मिळेल. तेथील चांगल्या सुविधा मिळतील. तसेच या विद्यार्थ्यांना वाहनाची सेवाही मिळणार आहे.

पटसंख्या कमी असलेल्या शाळा
शहरांचे नाव शाळांची संख्या
अंबरनाथ तालुका २४
भिवंडी पालिका ०४
भिवंडी तालुका ३८
कल्याण तालुका १७
कल्याण-डोंबिवली २६
मीरा-भार्इंदर पालिका ०५
मुरबाड तालुका ११८
नवी मुंबई पालिका १७
शहापूर तालुका ८८
ठाणे पालिका १ ०५
ठाणे पालिका २ ०६
उल्हासनगर पालिका १३

Web Title: 361 schools going to be closed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.