ठाणे जिल्ह्याच्या गांवखेड्यांमधील शाळांची रंगरंगोटी, पुनर्बांधणीसह ऐन दिवाळीत लक्ष फाऊंडेशनकडून विद्यार्थ्यांना ३७ सायकली!
By सुरेश लोखंडे | Published: November 13, 2023 06:46 PM2023-11-13T18:46:08+5:302023-11-13T18:46:17+5:30
येथील जिल्हा परिषदेच्या नियंणात जिल्ह्यातील गांवखेड्यातील प्राथमिक शाळा सक्रीयपणे सुरू आहे.
ठाणे : येथील जिल्हा परिषदेच्या नियंणात जिल्ह्यातील गांवखेड्यातील प्राथमिक शाळा सक्रीयपणे सुरू आहे. त्यापैकी मुरबाड, अंबरनाथ तालुक्यातील तब्बल सहा शाळांची निवड करून त्यांच्या पुनर्बांधणीसह, रंगरंगाेटी करीत शाळांचे रूपडे बदलापूर येथील लक्ष फाउंडेशनच्या ‘व्हील्स ऑफ होप’ हा उपक्रमातून बदलवले आहे. ऐवढेच नव्हे तर ऐन दिवाळीत लांबच्या शाळेत पायी जाणाऱ्या मुलांसाठी ३७ सायकीलींचे वाटप ऐन दिवाळीत करून विद्यार्थ्या चा आनंद दुगुणीत केला आहे.
शहरातील मुलांप्रमाणे ग्रामीण दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना त्यांची शाळा हवीहवीशी वाटावी. त्यांनी नियमित शाळेत येउन उच्च शिक्षित व्हावे, त्यांना शाळेची गाेडी लागावी आणि दुर्गम भागातील गांवखेडे उच्चशिक्षित व्हावे या हेतूने बदलापूर येथील लक्ष फाऊंडेशच्या अभिनव संकल्पनेतून ‘सिनिक्रॉन टेक्नॉलॉजीस, फ्लो ग्रुप कंपनी आणि विशाल भालेकर यांच्या आर्थिक पाठबळातून शालेय पातळीवर विविध उपक्रम हाती घेतले आहे. दिवाळी आधीच गांवखेड्याच्या शाळांची रंगरंगाेटी करून त्याचे दयनिवस्था दूर केली. आता ऐन दिवाळीत विद्यार्थ्या ना उच्च दर्जा च्या सायकली देउन त्यांना माेठा धिलासा दिला.
बदलापूर परिसरातील अनेक आदिवासी पाड्यातील आदिवासी विद्यार्थी यांना इयत्ता ५ वी नंतर पुढील शिक्षणासाठी रोज रानावनातून ४ ते ५ किलोमीटर पायपीट करीत शहरातील शाळेत जावे लागत. शिक्षणाचा हाच खडतर प्रवास सुखर करण्यासाठी व्हील्स ऑफ होप हा अनोखा उपक्रम लक्ष फाऊंडेशनकडून हाती घेण्यात आला. मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा लव्हाळी, शिखरे पाडा, वाशिवली भाकरी ,उंबरवेढे,धारोळ मांडव्याची वाडी पाड्यांमधील विद्यार्थ्यांना ३७ नव्या, कोऱ्या, उत्कृष्ट सायकलींचे वाटप केले. ह्या विद्यार्थ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने प्रकाश पसरविला.
या सायकलींचा स्विकार करताना या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य व उत्साह नमोल आणि हृदयस्पर्शी होता. या सायकलीच्या वाटपासाठी खास लक्ष फाउंडेशनचे अध्यक्ष शिरीष पाटील, कार्यवाहक हितेश ठाकरे, पांडुरंग शिर्के, यांनी महत्वाची भूमिका बजावून विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हस्य फुलवले.