ठाणे जिल्ह्यातील 37 शेतकऱ्यांचा आज मिळाला पहिला कर्जमाफीचा हप्ता 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 04:16 PM2017-10-18T16:16:16+5:302017-10-18T16:56:50+5:30

छत्रपती शिवाजी महाराज आत्मसन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचा पहिला हप्ता ठाणे जिल्ह्यातील 37 शेतकऱ्यांना प्रतिनिधीक स्वरूपात आज जिल्हाधिकारी कार्यालयात मिळाला.

37 farmers of Thane district got their first loan waiver today | ठाणे जिल्ह्यातील 37 शेतकऱ्यांचा आज मिळाला पहिला कर्जमाफीचा हप्ता 

ठाणे जिल्ह्यातील 37 शेतकऱ्यांचा आज मिळाला पहिला कर्जमाफीचा हप्ता 

Next

ठाणे - छत्रपती शिवाजी महाराज आत्मसन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचा पहिला हप्ता ठाणे जिल्ह्यातील 37 शेतकऱ्यांना प्रतिनिधीक स्वरूपात आज जिल्हाधिकारी कार्यालयात मिळाला. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे. जिल्हा नियोजन भवनाच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्यमंत्री रविंद्र शिंदे व जिल्ह्यातील सर्व खासदार, आमदार, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर व जिल्हा उपनिबंधक मीना आहेर आदींसह जिल्ह्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत या कर्जमाफीस प्रारंभ झाला. या नंतर आता ही कर्जमाफीची रक्कम पात्र 21425 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.

कर्जमुक्ती प्रारंभचा राज्यस्तरीय कार्यक्रम सह्याद्री अतिथीग्रह येथे पार पडल्यानंतर हा जिल्हास्तरीय कार्यक्रम पार पडला. येथील जिल्हानियोजन भवनमध्ये हा कार्यक्रम पार पडला. शेतकऱ्यांवर कर्जमाफीची वेळच येऊ नये यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन शिंदे यांनी केले. यावेळी कृषी कर्जमाफीच्या प्रमाणपत्रांचे वाटप शेतकऱ्यांना केले. 

राज्य शासनाने राबवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यातील एकूण २०७ विकास सहकारी संस्था आणि २० राष्ट्रीयकृत बँका पात्र ठरल्या असून त्यांचे अनुक्रमे २१ हजार ४२५ आणि १ हजार ५१६ लाभार्थी आहेत. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जून २०१७ पासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची सुरुवात झाली असून लाभार्थींच्या पहिल्या यादीतील ३७ लाभार्थी शेतकऱ्यांचा पालकमंत्री  शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी लाभार्थ्यांना कृषी कर्जमाफीच्या प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी पाण्याचा शाश्वत पुरवठा आवश्यक असून त्यासाठी रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती देण्यासोबतच शहरांमध्ये शेतमालाला असलेली मागणी लक्षात घेऊन अधिकाधिक आठवडी बाजार सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे  शिंदे म्हणाले. ठाणे जिल्ह्यामध्ये असलेल्या तलाव आणि बंधाऱ्यांमधला गाळ काढण्याचे काम देखील चांगले झाले असून त्यासाठी पुढाकार घेणारे खासदार श्रीकांत शिंदे आणि जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांचे शिंदे यांनी कौतुक केले.
 

Web Title: 37 farmers of Thane district got their first loan waiver today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.