सुरळीत वीज पुरवठ्याच्या दुरूस्तीचे ३८ कोटी खर्चाची कामे अद्याप कागदांवरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 10:47 PM2017-10-22T22:47:20+5:302017-10-22T22:47:29+5:30

गांवखेडे, तेथील उद्योग, कृषी पंप आदींना सुरळीत वीज पुरवठ्यासह नवीन वीज जोडण्यासाठी उपयुक्त ठरणाºया नवनीवन तांत्रिक उपकरणे, दुरूस्त्यां आदींसाठी ३८ कोटी सहा लाख ४२ हजार रूपये खर्चांची कामे मंजूर आहेत.

 38 crore cost recovery works on recovering power supply | सुरळीत वीज पुरवठ्याच्या दुरूस्तीचे ३८ कोटी खर्चाची कामे अद्याप कागदांवरच

सुरळीत वीज पुरवठ्याच्या दुरूस्तीचे ३८ कोटी खर्चाची कामे अद्याप कागदांवरच

Next

- सुरेश लोखंडे 
ठाणे - जिल्ह्यातील गांवखेडे, तेथील उद्योग, कृषी पंप आदींना सुरळीत वीज पुरवठ्यासह नवीन वीज जोडण्यासाठी उपयुक्त ठरणाºया नवनीवन तांत्रिक उपकरणे, दुरूस्त्यां आदींसाठी ३८ कोटी सहा लाख ४२ हजार रूपये खर्चांची कामे मंजूर आहेत. दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण ज्योती योजने अंतर्गत हाती घेतलेली ही कामे महावितरणकडून अद्यापही सुरू करण्यात आली नसून केवळ कागदावर असल्याचे निदर्शनात आले आहेत.
वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण, श्रेणीवर्धन, बळकटीकरण करण्यासाठी जिल्ह्यात दीन दयाळ उपाध्याय ग्रामीण ज्योती योजनेव्दारे विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. कल्याण, भिवंडी, शहापूर, मुरबाड आदी तालुक्यांमधील गावपाड्यां परिसरात स्विचिंग स्टेशन,, उच्चदाब - लघूदाब वाहिनी, नवीन वीज वितरण रोहित्र, केबल आदींची विविध कामे हाती घेऊन त्यावर ३८ कोटीं सहा लाख रूपये खर्चांची कामे मंजूर आहेत. मात्र ती अद्यापही सुरू करण्यात आली नसल्याचे दिशा समितीच्या बैठकीत उघडकीस आले.
वीज पुरवठा सुरळीत होण्यास उपयुक्त ठरणाºया या नवीन उपकरणांसह दुरूस्तीच्या कामस महावितरण विभागाने तत्काळ सुरू केल्यास वीज समस्या काही अंशी कमी होण्यास मदत होईल. जिल्ह्यात २४ तास वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी कृषी व अकृषीकची स्वतंत्र नवीन वीज वाहिन टाकण्याच्या कामासह गरीब कुटुंबियाच्या घरात वीज पुरवठा, संसद आदर्श ग्राम योजनेच्या गावातील विद्युतीकरण, नवीन जोडण्यांच्या कामांवर हा मोठा खर्चही मंजूर आहेत. एवढेच काय तर खाजगी एजन्सीसला देखील कामांच्या निविदा देखील देण्यात आल्या आहेत.मात्र केवळ पाहाणी आणि चौकशी यात वेळ घालवण्यात येत असल्यामुळे या कामास अद्यापही प्रारंभ झालेला नसल्याची बाब आढावा बैठकीत उघड झाली आहे.
जिल्ह्यातील पाच तालुक्यांमधील सुमारे ७५७ कामांवर ३८ कोटी सहा लाख रूपये खर्चाचे नियोजन करण्यात आले आहेत. कल्याण तालुक्यातील कामांवर सर्वाधिक १५ कोटी ८९ लाख रूपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. या खालोखाल मुरबाड तालुक्यात दहा कोटी ५८ लाख, शहापूरमध्ये नऊ कोटी दहा लाख आणि भिवंडीमध्ये दोन कोटी ४९ लाख रूपये खर्चांची कामे अद्यापही केवळ कागदोपत्री दिसत आहेत. नियोजनानुसारही काम वेळीच मार्गी लागल्यास ग्रामस्थांसह शेतकरी व उद्योगांची वीज पुरवठा सुरळीत होणे शक्य आहे. वीजे अभावी आंधारात चाचपडणाºया नागरिकाना वीज पुरवठ्याचा लाभ होणे शक्य आहे.

Web Title:  38 crore cost recovery works on recovering power supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे