महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत ३९ ग्रंथ भेटीला; मराठी भाषा गौरव दिनाचे निमित्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 12:57 PM2024-02-27T12:57:46+5:302024-02-27T12:57:57+5:30

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या स्थापनेपासून मंडळाने पुस्तक प्रकाशन या मुख्य उद्दिष्टानुसार आजमितीपर्यंत ६६६ ग्रंथ प्रकाशित केले आहेत.

39 books will launch by Maharashtra State Board of Literature and Culture; On the occasion of Marathi Language Glory Day Lokmat Sahitya Award thane | महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत ३९ ग्रंथ भेटीला; मराठी भाषा गौरव दिनाचे निमित्त

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामार्फत ३९ ग्रंथ भेटीला; मराठी भाषा गौरव दिनाचे निमित्त

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून संपूर्ण वर्षभरात छपाई होऊन प्रसिद्ध झालेली पुस्तके दरवर्षी मराठी भाषा गौरव दिनी प्रकाशित करण्याची मंडळाची अनेक वर्षांची परंपरा आहे. यानुसार अत्यंत मौलिक अशा नव्या ३९ पुस्तकांचे प्रकाशन मराठी भाषा गौरवदिनी २७ फेब्रुवारी रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या स्थापनेपासून मंडळाने पुस्तक प्रकाशन या मुख्य उद्दिष्टानुसार आजमितीपर्यंत ६६६ ग्रंथ प्रकाशित केले आहेत. मागील वर्षभरात छपाई झालेल्या ३९ पुस्तकांमध्ये प्रामुख्याने डॉ. अरुणा ढेरे लिखित "भारतीय विरागिणी' हे पुस्तक प्रकाशित करण्यात येत आहे. मंडळामार्फत प्रकाशित होत असलेल्या अन्य महत्त्वपूर्ण पुस्तकांमध्ये 'महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक स्थित्यंतराचा इतिहास' (खंड-२) १९०१- १९५० (भाग-१ व भाग-२) हा रमेश वरखेडे यांनी लिहिलेला ग्रंथ, कै. प्राचार्य रामदास डांगे व कार्यकारी संपादक सुप्रिया महाजन यांनी संपादित केलेल्या 'मराठी व्युत्पत्तिकोश' हे पुस्तक, श्रीमती मंगला वरखेडे यांनी संपादित केलेल्या 'अक्षरबालवाङ्गय' या प्रकल्पातील तिसरा खंड "भ्रमणगाथा' हा खंड, श्री बाळकोबा नरहर भावे (बाळकोबा भावे) यांचे समग्र वाङ्गय चार खंडात प्रकाशित करण्याचा प्रकल्प मंडळाने पूर्ण केला असून, डॉ. विश्वास पाटील यांनी संपादन केलेल्या खंड-३ आणि खंड-४ चा समावेश आहे.

'महाराष्ट्राचे शिल्पकार' या चरित्रमालेअंतर्गत यापूर्वी प्रकाशित झालेले क्रांतिसिंह नाना पाटील यांचे पुनर्मुद्रित चरित्र, गोपाळ कृष्ण गोखले यांचे चरित्र, यापूर्वी प्रकाशित झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुनर्मुद्रित चरित्र, 'कस्तुरबा गांधी जीवन चरित्र', जगन्नाथ तथा नाना शंकरशेट यांचे चरित्र, श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांचे चरित्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र, डॉ. पतंगराव कदम यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची ओळख करुन देणारे चरित्र, गौतमी माहात्म्य व तिच्या अष्टांग स्थानांचा सांस्कृतिक अभ्यास' या त्रिखंडात्मक प्रकल्पांतर्गत भाग-२ 'अष्टांगांचा अभ्यास' व भाग-३ 'गोदा संस्कृती' हे दोन महत्त्वपूर्ण खंड वाचकांना उपलब्ध होणार आहे.
 

Web Title: 39 books will launch by Maharashtra State Board of Literature and Culture; On the occasion of Marathi Language Glory Day Lokmat Sahitya Award thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Lokmatलोकमत